Mumbai Police : गँगस्टर फहिम मचमचच्या हस्तकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Mumbai Police : गँगस्टर फहिम मचमचच्या हस्तकाला अटक

मुंबई : दाऊदचा विश्वासू फहिम मचमचच्या हस्तकाला भायखळा (Byculla) येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना (Mumbai Police) यश आले आहे. अनिकेत उनवणे (29) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी डोंगरी (Dongari) येथील एका व्यावसायिकाला मारण्यासाठी आला होता. त्याच्याकडून अग्निशस्त्रासह पाच जिवंत काडतुस जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. भायखळा येथील घोडपदेव येथील बिल्मिल्ला हॉटेलसमोर संशयीत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला (Crime Branch) मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील (South Mumbai) व्यावसायिकांना धमकण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. तो पाकिस्तानात (Pakistan) वास्तव्याला असलेल्या फहिम मचमचच्या संपर्कात असल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. ( Gangster Fahim machmach supportive Aniket unavane arrested by mumbai police-nss91)

Web Title: Gangster Fahim Machmach Supportive Aniket Unavane Arrested By Mumbai Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top