esakal | डोंबिवलीत खड्ड्यांची समस्या जैसे थे; मनसेचे पुन्हा आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

MNS Strike

डोंबिवलीत खड्ड्यांची समस्या जैसे थे; मनसेचे पुन्हा आंदोलन

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : गणेशोत्सव (Ganpati Festival) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपतीचे आगमन खड्ड्यातून (potholes on road) होणार का? असा सवाल उपस्थित झाल्यानंतर पालिका प्रशासनाने (KDMC) शहरातील खड्डे लवकर बुजविले जातील असे आश्वासन दिले आहे. मात्र अजूनही कामास सुरवात झाली नसल्याने मनसेने (MNS) दुसऱ्यांदा खड्ड्यांविरोधात प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन (Strike) केले.

हेही वाचा: गळा आवळून चेहरा जाळलेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा; पतीला ठोकल्या बेड्या

कल्याण डोंबिवली शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची हालत खराब झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यात यावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून नागरिक तसेच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. मात्र प्रशासन त्याकडे गांभिर्याने लक्ष देत नाही. यापुरी मनसेने एमआयडिसीतील खड्डे स्वखर्चाने बुजवून आंदोलन केले होते.

गणेशोत्सव तोंडावर आल्याने मंडळे, घरगुती गणपतीचे आगमन होणार आहे. खड्डे बुजविण्यात येतील असे दोन तीन दिवसांपूर्वी पालिकेने जाहीर केले होते. मात्र अद्याप खड्डे बुजविण्याचे काम हाती न घेतल्याने शनिवारी मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, संदीप म्हात्रे, अरुण जांभळे, मंदा पाटील यांसह अनेक कार्यकर्त्यांनी जमून डोंबिवलीत टिळक पुतळ्याजवळ खड्यात बसून सत्ताधारी, प्रशासन यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले.

loading image
go to top