
डोंबिवली : डायघर येथील ठाणे महानगर पालिकेच्या घन कचरा प्रकल्पात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाला लागलेली आग सलग तिसऱ्या दिवशी धुमसत आहे. आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले असून त्याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. विशेष म्हणजे डायघर गावातील शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.