गोराई रिफ्युज ट्रान्सफर स्टेशनमधून कचरा हटवणार

गोराई रिफ्युज ट्रान्सफर स्टेशनमधून कचरा हटवणार

गोराई रिफ्युज ट्रान्स्फर स्टेशनमधून कचरा हटवणार
कांजूर, देवनार डम्‍पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट; सहा कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गोराई येथील रिफ्युज ट्रान्स्फर स्टेशनमधून जमा झालेला कचरा हटवण्याचा निर्णय घनकचरा विभागाने घेतला आहे. कांजूर आणि देवनार डम्‍पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची अंतिम विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यासाठी सुमारे सहा कोटींचा खर्च केला जात आहे.
पालिकेच्या चार स्टेशन्समध्ये सुमारे ४०० ते ७०० मेट्रिक टन कचरा दररोज साठवला जातो. गोराई आरटीएसमध्ये दररोज ४०० मेट्रिक टन कचरा गोळा होतो. कचऱ्याचे विभाजन सुधारण्यासाठी पालिकेने या आरटीएस केंद्रांमध्ये काही सुधारणाही केल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून येथील कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. त्‍यामुळे देवनार आणि कांजूरमार्ग येथील लँडफिलमध्ये पुनर्वापर करता न येणारा कचरा कमी झाला आहे.
गोराई येथील आरटीएस केंद्रावर गेल्या वर्षभरापासून सुमारे १०० टनापेक्षा अधिक कचरा जमा झाला असण्याची शक्यता आहे. हे केंद्र तात्पुरते असल्याने येथील कचरा डम्पिंग ग्राऊंडवर हलवला जाणार आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू करून अर्ज मागवले आहेत. येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्‍यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने येथील कचरा डम्पिंग ग्राऊंडवर नेला जाईल. पालिका यावर ५,८६,५६,९६० रुपये खर्च करत आहे.

कचऱ्याचे वर्गीकरण
घनकचरा तात्पुरता जमा करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने ट्रान्स्फर स्टेशन प्रक्रिया केंद्र उभारली. महालक्ष्मी, कुर्ला, वर्सोवा आणि गोराई येथे पालिकेने ही केंद्रे उभारली आहेत. मुंबईतील कचरा सध्या देवनार आणि कांजूरमार्ग कचरा प्रक्रिया युनिटमधील लँडफिलमध्ये टाकला जातो. पालिकेच्या प्रभागांमधून जो घनकचरा मिळतो तो येथे थेट टाकण्यापूर्वी तो कचरा ट्रान्स्फर स्टेशन येथे जमा केला जातो. त्यानंतर कालांतराने योग्य वर्गीकरण केलेला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो.
........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com