स्वयंपाकातील 'ही' फोडणी आता पडणार महागात

garlic expensive in mumbai
garlic expensive in mumbai

मुंबई-  कांदा आणि इतर भाज्यांच्या वाढत्या दरांनी गृहिणींचे बजेट कोलमडलेले असतानाच, फोडणीतील महत्त्वाचा घटक असलेला लसूणही महागला आहे. घाऊक बाजारात लसणाची आवक घटल्याने गेल्या दोन-तीन दिवसांत लसणाच्या दरात ६० ते ८० रुपयांची वाढ झाली आहे. अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला आणि फुलांसह लसणाच्या उत्पादनालाही बसला आहे. परिणामी काल-परवा १८० ते २०० रुपये किलोने मिळणारा लसून आज किरकोळ बाजारात २८० रुपयांनी विकला जात होता. भाज्या आणि कांद्यापाठोपाठ आता लसूणही किलोला तीनशेच्या आसपास गेल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. 

ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये कांदे, लसूण आणि बटाट्यांचा नवा माल बाजारात येतो. यंदाच्या वर्षी अवकाळी पावसामुळे तयार झालेला माल पाण्यात बुडाला. पावसामुळे नवा माल शेतकऱ्यांना काढता आला नाही. त्यामुळे मालाची आवक नसल्याने जुन्या मालावर मागणी भागवली जाते. पावसाच्या नुकसामुळे लसणाचे भाव वाढले आहेत. घाऊक बाजारात २०० रुपये किलो लसूण आहे. किरकोळ बाजारात २८० रुपयांनी लसूण विकला जात आहे. 

ठाण्याच्या किरकोळ बाजारात लसणाचे भाव २८० ते ३०० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये लसणाला प्रतिकिलो ६० ते १३० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.

सिलिंडर महागले, भाज्यांच्या किमती वाढल्या, आता लसूणही महाग... घरखर्चाला महिन्याकाठी १० हजार रुपयेही कमी पडू लागले आहेत. निसर्गाची अवकृपा अशीच राहिल्यास घर खर्च भागवणे कठीण जाईल. 
- प्रतिमा सरमळकर, गृहिणी

घरकाम करून मी घर चालवते. सर्वच महागल्याने बजेट कोलमडले आहे. लसणाचे भाव पहाता तो खरेदी करणे मला परवडत नाही. 
- जिजाई कांबळे, घरकाम करणारी महिला

पूर्वीचे दर -  १८० ते २००
आताचे दर - २४०ते २८०

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com