Gas Leakage in Boisar Tarapur
sakal
- सुमित पाटील
बोईसर - बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यामध्ये आज (ता. 08) वायु गळतीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. प्लॉट क्रमांक टी-१५० वरील आरती ड्रग्स लिमिटेड या कारखान्यातून संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास वायुगळती झाल्यामुळे परिसरातील सालवड शिवाजीनगर येथील नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.