Mukesh Ambani: स्फोटक प्रकरणाचा खरा सूत्रधार सचिन वाझेचं- NIA

Mukesh Ambani: स्फोटक प्रकरणाचा खरा सूत्रधार सचिन वाझेचं- NIA

मुंबईः  २५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवासस्थान अँटेलिया बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या. या जिलेटीनच्या कांड्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेनेच खरेदी केल्या असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)नं दिली आहे. ही स्फोटकं वसई येथून आणली असावीत, असा संशय एनआयएला आहे. त्यादृष्टीने एनआयएनं तपास सुरु केला आहे. 

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएच्या हाती महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येच्या दिवशी सचिन वाझेनं ही ऑडी वापरली अशी चर्चा रंगली होती, मात्र एनआयएनं या वृत्तास दुजोरा देण्यास नकार दिला आहे. एनआयए सध्या मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणाचा तपास करत आहे. 

18 फेब्रुवारीला वाझेनं एका चालकाच्या मदतीने ती स्कॉर्पिओ कार विक्रोळीवरून ठाण्यातील वाझे यांच्या घरी साकेत सोसायटीमध्ये आणली. 18 फेब्रुवारीला ती कार साकेत सोसायटीमध्ये ठेवल्यानंतर 19 फेब्रुवारीला ती कार पोलिस आयुक्तालयात आणण्यात आली. तेथे तीन दिवस ही कार ठेवण्यात आली. त्यानंतर 21 फेब्रुवारीला ही कार पोलिस आयुक्तालयातून पुन्हा साकेत सोसायटीत नेण्यात आली. त्यानंतर  फेब्रुवारीला रात्री ही कार तेथून निघाली आणि त्यानंतर ती अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्याजवळ ठेवण्यात आली. या सर्व कारच्या प्रवासासाठी दोन चालकांचा वापर करण्यात आला आहे. त्यातील एक चालक पोलिस दलातील आहे, तर एका खासगी चालकाचा वापर करण्यात आला आहे. या दोन्ही चालकांचा जबाब एनआयएने नोंदवला आहे. ही कार अँटेलिया बंगल्याजवळील कारमायकल रोड येथे ठेवण्यात आली. त्यावेळी वाझे स्वतः इनोव्हा कारमध्ये घटनास्थळी उपस्थित होते, असे त्यातील एका चालकाने जबाब दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Gelatin sticks Sachin Waze got National investigation Agency said

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com