गेल्या 5 वर्षात लिंग दर घटला! राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 अहवालाची माहिती 

गेल्या 5 वर्षात लिंग दर घटला! राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 अहवालाची माहिती 

मुंबई   : राज्यात गेल्या पाच वर्षात लिंग दर घटल्याची माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस -5) च्या पाचव्या अहवालातून समोर आली आहे. पाच वर्षात जन्मलेल्या बाळांच्या लिंगाच्या संख्येत 11 पूर्णांकांनी घट नोंदवण्यात आली आहे. (एनएफएचएस-4) मध्ये लिंगाप्रमाणे जन्माचे प्रमाण 1000 मुलामागे 924 मुली तर, (एनएफएचएस-5 )मध्ये हेच प्रमाण 1000 मुलामागे 913 मुलींची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यानुसार केलेल्या केलेल्या विश्लेषणामध्ये बीड जिल्ह्यात दर सर्वात कमी नोंदवण्यात आला आहे. 2015-16 मध्ये 1 हजार 046 वरुन 2019 ते 20 मध्ये 843 एवढा लिंग दर नोंदवण्यात आला. अनुक्रमे, जळगाव (922 वरुन 857) , अकोल (934 वरुन 896),हिंगोली (992 वरुन 838), औरंगाबाद (1,130 वरुन 875), जालना (880 ते 867), नांदेड (961 वरुन 888), नाशिक (867 ते 816), नंदूरबार (1,023 वरुन 885) and पुणे (927 वरुन 873).

दरम्यान, असेही काही जिल्हे आहेत ज्यात जन्मावेळी लिंग गुणोत्तरात वाढ दर्शवली आहे. उदाहरणार्थ, धुळ्यात याचे प्रमाण 853 वरुन 919, कोल्हापूर (651 वरुन 937), लातूर (920 वरुन 1,265), रायगड (793 वरुन 871), सिंधुदूर्ग (824 वरुन 874) उस्मानाबाद (821 ते 1,050), सांगली (913 वरुन 1,012) आणि सोलापूर (815 वरुन 960). 

राज्यातील आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवणार्या प्रणालीत (सीआरएस) असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांतील छोट्या छोट्या 60 गावांमध्ये लिंग जन्म दराचे प्रमाण घटले असून 900 मुली आणि 1000 मुली असे याचे गुणोत्तर आहे. यामध्ये धुळ्यात (893 मुली / 1,000 मुले), सोलापूर (895), औरंगाबाद (896), जळगाव (889), कोल्हापूर (870), जालना (879), गोंदिया (897), हिंगोली (891) आणि बुलढाणा (857) . 

एकंदरीत, लिंग जन्म दर नोंदणी प्रणालीनुसार( सीआरएस), राज्यात 2018 मध्ये 1000 मुलांमागे 916 मुली तर, 2016 मध्ये 1000 मुलांमागे 904 मुली असा लिंग दर होता. 

राज्य आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले की सीआरएस आकडेवारी सामान्यत: जन्माच्या वेळेस लिंग गुणोत्तरासाठी मानली जाते. दरम्यान,जन्मावेळी लिंग गुणोत्तर सुधारण्याची गरज आहे आणि यासाठी अनेक उपक्रम राबवण्याची गरज आहे," 

सीएसआर मध्ये असलेल्या आकडेवारीत लैंगिक प्रमाण वाढलेले आहे. मात्र, काही जिल्हे असे आहेत जिथे लिंग दर खूप कमी आहे. त्या जिल्ह्यांना शोधले आहे. 
लवकरच आम्ही नवीन रणनीतीद्वारे मोहीम राबवू, ज्यामध्ये लोकांना जागरूक केले जाईल.


डॉ. अर्चना पाटील,
राज्य आरोग्य संचालक

Gender rates have dropped in the last 5 years Information on the National Family Health Survey 5 report

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com