दर्जेदार शिक्षण इंग्रजी शाळेत असते हे डोक्यातून काढून टाका: बच्चू कडू

राज्यातील इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांच्या कारभारावर तोशेरे
Bacchu Kadu on English Medium Schools
Bacchu Kadu on English Medium Schoolse sakal
Updated on

मुंबई : इंग्रजी म्हणजे दर्जेदार असतं हे डोक्यातून काढून टाका, मराठी शाळा सुद्धा दर्जेदार असतात, हे आम्ही अभिमानाने सांगता आले पाहिजे. आम्ही आमच्याच भाषेला पायाखाली ठेवून इंग्रजीचा वाहवा करत असू तर ते चुकीचे असल्याचे सांगत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांच्या कारभारावर तोशेरे ओढले.

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा)ने आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीलय अधिवेशन आयेाजित केले होते, त्यावेळी कडू हे प्रमुख पाहुण म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील, प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ गावंडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री डेव्हीड प्लॅनेट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कडू म्हणाले की, आर्थिक विषमता चालेल, परंतु ज्या दिवशी देशामध्ये शैक्षणिक विषमता निर्माण होईल, त्या दिवशी देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आता शैक्षणिक विषमता वाढत चालली आहे. आज मंत्र्यांचं तुमचं पोरगं चांगल्या शाळेत शिकतं आणि आम्हाला मते देणाऱ्याच्या पोराला शिक्षण भेटते की नाही हाच आमच्या पुढे प्रश्न आहे.समाजात एक मोठी दरी निर्माण झालेली आहे. जसा पैसा तसा देव आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्यासाठी आमच्या गावातली मरीमाय असते. जसे पैसे तसे शिक्षण असेल तर ज्यांच्याकडे पैसेच नाही, ते तुम्हाला जगू देणार नाहीत, हे तुम्हाला मी सांगतो.

पैशाशिवाय शिक्षण मिळत नसेल तर सरकारलाही काही निर्णय घ्यावे लागतील. मात्र खाजगी शाळांवाले सगळेच चूकीचे आहेत, असे नाही. मात्र जे शिक्षणाचा धंदा करत असतील त्यांना दणके देण्यासाठी मेस्टाचे काय कार्यक्रम आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी केला.शिक्षण म्हणजे फक्त पैसा हे सुद्धा गणित डोक्यातून काढले पाहिजे. इंग्रजीत पोरग बोललं की, बाप उड्या मारतो. मात्र इंग्रजी बोलतो म्हणून सगळे हुशार असे नाही. इंग्रजी शिकवलेले २० टक्के पोरं गावाच्या बाहेर जातात, ८० टक्के गावातच राहतात, त्यांच्यासाठी आमच्याकडे काय व्यवस्था आहे, ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. शिक्षणाधिकाऱ्याला परत करण्याची ताकद जर चपराशी आणि संस्थाचालकांमध्ये आहे तर सरकार आहे कुठे? असा सवालही कडू यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Clouds Arabian Sea mumbai kerala goa karnataka maharashtra rain
Pune Toxic Liquor Tragedy Highlights Staff Shortage in Excise Department
Rural Road Network Set for Expansion as Cabinet Clears 6,429 Crore Infrastructure Plan
₹36,585 Crore Farm Loan Waiver Gets Green Signal; Know the Terms and Eligibility
Marathi News Esakal
www.esakal.com