डिजिटायझेशन व पारदर्शकतेमुळे विमा घेणे सोपे झाले - राकेश जैन

डिजिटायझेशन व पारदर्शकतेमुळे विमा घेणे सोपे झाले - राकेश जैन

मुंबई : विमा क्षेत्रात डिजिटायझेशन (Digitization in insurance) आल्यामुळे वेबसाईटवर किंवा फोनवरच ग्राहकांना विमापॉलिसीचा (insurance policy) सर्व तपशील दिसू लागला. त्यामुळे आपल्याला अमुक गोष्ट माहित नव्हती, अशी ग्राहकांची तक्रार नाहिशी झाली असून डिजिटायझेशनमुळे विमा क्षेत्रात पारदर्शकता व सुलभता आली, असा दावा रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे सीईओ राकेश जैन (Rakesh jain) यांनी सकाळ कडे केला.

डिजिटायझेशन व पारदर्शकतेमुळे विमा घेणे सोपे झाले - राकेश जैन
तेलतुंबडेंच्या जामीन अर्जावर १६ फेब्रुवारीला सुनावणी

विमा क्षेत्रात आम्ही सर्वप्रथम डिजिटायझेशन आणले आता इर्डा (विमा नियामक) च्या आदेशामुळे सर्वांनीच डिजिटायझेशन केले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी व शंकाही फारच कमी झाल्या आहेत. अशा स्थितीत लोक वेबसाईटवर शोध घेऊन सारा तपशील जाणून घेऊन नेमका आपल्याला हवा तोच सुयोग्य विमा घेतात. डिजिटायझेशनमुळे लोकशिक्षण तसेच लोकांना माहिती मिळणेही अत्यंत सोपे झाले आहे. डिजिटायझेशनमुळे सर्वत्र शाखा उघडणे, तेथे मोठ्या संख्येने कर्मचारी व फाईलींचा ढीग ठेवणे याचीही गरज उरली नाही. त्यामुळे काम तर व्यवस्थित आणि वेगाने होतेच पण डिजिटायझेशन केलेल्या कंपन्या ग्राहकांना किफायतशीर दरात जास्त विमाछत्र तसेच समाधान आणि पारदर्शकता देतात, असे जैन यांनी दाखवून दिले.

कोविडकाळात आरोग्य विम्यासंदर्भात लोकांमध्ये जागरुकता आली आहे. मात्र आपण राहतो त्या घराच्या विम्यासंदर्भात जागरुकता येणे गरजेचे आहे. आपल्या इमारतीची सहकारी सोसायटी इमारतीचा विमा काढते, मात्र घराचा विमा वेगळा असतो. घराला आग लागू शकते, महापुराने नुकसान होते, हे टाळण्यासाठी घराचा विमाही गरजेचा आहे. तसाच वैयक्तिक किंवा आरोग्य विमाही तरुणपणीच काढावा. आजारी पडल्यावर विम्याची आठवण येते, तसे करू नये. अनेक कुटुंबांमध्ये फक्त कर्त्या पुरुषाचाच विमा काढला जातो, त्यामुळे इतर कुटुंबियांच्या विम्यासाठीही आम्ही त्यांना हफ्त्यांमध्ये सवलत देतो, असेही त्यांनी सांगितले.

विमा ही गुंतवणुक किंवा बचत नसते तर रिस्क ट्रान्सफर (आपला बोजा विमा कंपनीकडे देणे) असते. तुमची जीवनशैली आयुष्यभर उत्तम असावी याचे विमा हे एक साधन आहे. त्यामुळे तुमची जीवनशैली कशी असेल किंवा कशी असावी हे तुम्ही ठरवा व त्यानुसार विमा काढा. उदा. आजारी पडल्यावर नाक्यावरील साध्या रुग्णालयात उपचार घेणार की फाईव्हस्टार रुग्णालयात उपचार घेणार हे ठरवून तसे आरोग्य विमाछत्र आणि विम्याचा हफ्ता निवडा. तुम्ही गावात रहात असाल तर तेथील रुग्णालयात वैद्यकीय खर्च कमी असतो, त्यामुळे तेथे विमाहफ्ता कमी असणार, पण मुंबईत विमाहफ्ता जास्त येणार. हे ध्यानात ठेऊन, समजूनच विमा काढा. आपली जीवनशैली सुरक्षित ठेवण्यासाठी विमा घ्या, असेही प्रतिपादन जैन यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com