चीनला आणखी एक दणका, आता मुंबईतील 'मेगा प्रोजेक्ट' मिळणं झालं आणखी अवघड..

समीर सुर्वे 
Sunday, 26 July 2020

बई महानगर पालिकेतील महाकाय प्रकल्प चिनी कंपन्यांना मिळणे अवघड झाले आहे.

मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील महाकाय प्रकल्प चिनी कंपन्यांना मिळणे अवघड झाले आहे. चिनी कंपन्यांकडून प्रकल्प पुर्ण करुन घ्यायचे का नाही या विचारात महापालिका असताना केंद्रानेही नवी नियमावली तयार केल्याने आता निवीदा प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुलूंड गोरेगावर जोड रस्त्यातील भुयारी मार्गाचे काम करण्यास चिन मधील कंपन्यांनी तयारी दाखवली होती. मात्र, आता हे काम या कंपन्यांना मिळणे अवघड झाले आहे.

मुलूंड गोरेगाव जोड रस्त्याच्या भुयारी मार्गासाठी गेल्यावर्षी जागतिक पातळीवर स्वारस्याची अमिरुची (एक्‍सप्रेस ऑफ इंटरेस्ट) मागण्यावर आली होती. यात जगभरातील 30 कंपन्यांनी या प्रकल्पासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन (निविदा पुर्वीचा टप्पा ) मागवण्यात आल्या आहेत. त्यांची प्रक्रिया सुरु आहे. त्यातच शुक्रवारी (ता.24) केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांसाठी नवी नियमावली तयार केली आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना भारताच्या सिमे लगतच्या देशांशी एखादा व्यवहार करायचा असल्यास संबंधीत कंपनीची नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र एक प्राधिकरण तयार करावे असे नमुद आहे.

मोठी बातमी - कोरोना गेला उडत! राजोडी समुद्रकिनाऱ्यावर तरुणाईच्या प्रेमाला बहर; पावसाळी वातावणाचा आनंद लुटन्यासाठी गर्दी

चिन बरोबरच जपान, कोरिया तसेच इतर देशातील 30 कंपन्यांनी या प्रकल्पात काम करण्याची इच्छा गेल्या वर्षी व्यक्त केली होती. भुयारी मार्ग तयार करण्यात चिनी कंपन्यांना प्राविण्य आहे. लॉकहाऊनच्या काळात राज्य सरकारने चिनच्या काही कंपन्यांबरोबर हजारो कोटींचे करार केले होते. मात्र, केंद्र सरकारने हे करार स्थगित करण्याचे निर्देश राज्य सरकारले दिले. त्यानंतर महापालिकाही चिनी कंपन्यांना भुयारी मार्ग तयार करण्याच्या कामात सामावून न घेण्याचा विचार करत होते. मात्र, आता चिनी कंपन्यांना काम मिळणे अवघड झाले आहे.

नरीमन पॉईंट ते वरळी पर्यंतच्या किनारी मार्गासाठी प्रियदर्शनी पार्क ते नरीमन पॉईंटपर्यंत भुयारी मार्ग तयार करण्यता येत आहे. हे काम भारतीय कंपनी करत असली तरी भुयार खोदण्याचे काम करण्यासाठी बोरींग मशिन चिन मधून आणण्यात आली होती. ही मशिन जोडण्यासाठी चिनी तज्ञांची मदत घेण्यात येणार होती. मात्र, आता पालिका देशातील तज्ञांकडून ही मशिन जोडून घेणार आहे.

केंद्र सरकारने शुक्रवारीच मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार निवीदा प्रक्रियेत सुधारण करण्यात येईल - पी. वेलारसू , अतिरीक्त आयुक्त मुंबई महानगर पालिका

मोठी बातमी - ठाण्यात रस्ता एक, अपघात तीन; उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळला ५० फूट खाली...

कसा आहे भुयारी मार्ग

गोरेगाव पासून हा भुयारी मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यांच्या हद्दीतून थेट मुलूंड ऐरोली जोड रस्त्या पर्यंत येणार आहे.त्यासाठी फिल्मसिटी पासून भांडूप खिंडीपाठा पर्यंत 13 मिटर व्यासाचा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.यात संजय गांधी राष्ट्रीय उद्याना पासून खिंडी पाडा पर्यंत 4.7 किलोमिटरचा संपुर्ण भुयारी मार्ग आणि फिल्मसीटीच्या पुढे साधारण एक किलोमिटरचा बॉक्‍स टनेल असेल.यासाठी साधारण 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा खर्च अंदाजित आहे.

getting massive project in mumbai is difficult for chinese companies norms changed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: getting massive project in mumbai is difficult for chinese companies norms changed