11 वर्षांपासून इमारतीचे बांधकाम सुरूच! संतप्त नागरिकांचे आंदोलन

11 वर्षांपासून इमारतीचे बांधकाम सुरूच! संतप्त नागरिकांचे आंदोलन मुंबईच्या घाटकोपरमध्ये रहिवाशांनी सरकारला दिला इशारा Ghatkopar people waiting for their houses from 11 years to redevelop agitating against govt
11 वर्षांपासून इमारतीचे बांधकाम सुरूच! संतप्त नागरिकांचे आंदोलन

घाटकोपर: मुंबईतील घाटकोपर परिसरात पश्चिमेला रामनगर (अ) येथील सिंहगड आणि सिंधुदुर्ग सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांनी रविवारी (1 ऑगस्ट) तीव्र आंदोलन केले. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संक्रमण शिबिराबाहेर हक्काच्या घरांसाठी या लोकांनी आंदोलन करत आवाज उठवला. गेल्या 11 वर्षांपासून दोन सोसायट्यांच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. पण त्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. त्यासोबत दरम्यानच्या काळात त्यांना जेथे राहण्याची सोय करून दिली होती, त्या संक्रमण शिबिराचीही अवस्था आता वाईट झाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. (Ghatkopar people waiting for their houses from 11 years to redevelop agitating against govt)

11 वर्षांपासून इमारतीचे बांधकाम सुरूच! संतप्त नागरिकांचे आंदोलन
आरोग्य सेविकांनी खात्री केल्यानंतरच लसीकरण, महापौरांची माहिती

सिंहगड सोसायटीत 187 तर सिंधुदुर्ग सोसायटीत 113 सदस्य राहत असून गेल्या 11 वर्षांपासून राहिवाशी संक्रमण शिबिरात राहत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील SRA चे बांधकाम रखडले असल्याने रहिवाशी कमालीचे त्रस्त आहेत. तसेच राहत असलेल्या संक्रमण शिबिराची देखील दुरवस्था झाली आहे. "आमचे रखडलेले बांधकाम पूर्ण करा. आम्हाला आमचे हक्काचे घर द्या", अशी मागणी करत आज सिंहगड व सिंधुदुर्ग सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांनी एकत्रित येत आंदोलन केले.

घाटकोपरमधील संतप्त नागरिक
घाटकोपरमधील संतप्त नागरिक

शासनाने आमचे रखडलेले बांधकाम पूर्ण करावे. विकासक व एसआरए अधिकाऱ्याची तात्काळ बैठक घेऊन या प्रोजेक्टला गती द्यावी. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर रहिवाशी तीव्र आंदोलन करतील.

- संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर शेट्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com