घाटकोपर स्थानकात आज, उद्या ब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

मुंबई - मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकात पायाभूत सुविधांच्या कामासाठी शनिवार-रविवारी (8 व 9 जुलै) रात्रीचा सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. शनिवारी रात्री 12.45 ते रविवारी सकाळी 6.45 पर्यंत पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर हा ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. 

सीएसएमटी येथून शनिवारी रात्री 12.28 ला ठाण्याला सुटणारी आणि रविवारी ठाणे येथून सकाळी 4.40 वाजता सीएसएमटीला सुटणारी गाडी रद्द केली जाणार आहे. ब्लॉक कालावधीत रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनसवर येणाऱ्या मेल एक्‍स्प्रेस गाड्या काही वेळ थांबवण्यात येतील आणि आपल्या नियोजित स्थानकात दीड ते अडीच तास उशिराने पोहचतील. 

रविवारी मेल एक्‍स्प्रेस गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान सीएसएमटीच्या दिशेला धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी, दादरला येणाऱ्या मेल एक्‍स्प्रेस गाड्या रात्री 2.20 ते 4.20 पर्यंत धीम्या मार्गावरून धावतील आणि 20 मिनिटे उशिराने पोहचतील. 

खालील गाड्यांचे अंशत: रद्दीकरण 
11062 दरभंगा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस, 12541 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस, 11016 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्‍स्प्रेस ठाणे स्थानकात थांबवण्यात येतील. 

खालील गाड्यांच्या वेळेत बदल 
गाडी क्रमांक 12165 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी रत्नागिरी एक्‍स्प्रेस 5.23 ऐवजी 6.55 ला सुटेल. 
गाडी क्रमांक 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्‍स्प्रेस व्हाया इलाहाबाद आपल्या नियोजित वेळेव्यतिरिक्त 6.35 ऐवजी 7.05 ला सुटेल. 
गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्‍स्प्रेस 6.55 ऐवजी 8.30 वाजता सुटेल. 
गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-दरभंगा एक्‍स्प्रेस 12.15 ऐवजी2.20 ला सुटेल. 

Web Title: ghatkopar railway station block