बायकोला 'इम्प्रेस' करण्यासाठी इंजिनिअर बनला 'हॅकर'; पोलिसांनी 'असा' लावला छडा I Mumbai Police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Police

'आरोपीला त्याच्या पत्नीला इंप्रेस करायचं होतं. त्याची पत्नी नोकरीसाठी परदेशात जाण्याचा विचार करत होती.'

Mumbai Police : बायकोला 'इम्प्रेस' करण्यासाठी इंजिनिअर बनला 'हॅकर'; पोलिसांनी 'असा' लावला छडा

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेनं नुकतंच एका 27 वर्षीय सिव्हिल इंजिनिअरला अटक केलीये. या तरुणानं पत्नीच्या पासपोर्ट पडताळणीसाठी पासपोर्ट (Passport) शाखेची यंत्रणा हॅक केल्याचा आरोप आहे. असं करून त्यानं पत्नीसह तीन जणांचे पासपोर्ट काढले आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, 'आरोपीला त्याच्या पत्नीला इम्प्रेस करायचं होतं. त्याची पत्नी नोकरीसाठी परदेशात जाण्याचा विचार करत होती. संशय येऊ नये म्हणून अभियंत्यानं आणखी दोन पासपोर्ट काढले. आरोपी शाहच्या पत्नीनं सादर केलेली कागदपत्रं बरोबर आहेत, त्यात कोणतीही अडचण आली नाही. मात्र, एफआयआरनंतर शाहच्या पत्नीचा पासपोर्ट काढून घेण्यात आला आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.'

तरुणानं ज्या महिलांचे पासपोर्ट मंजूर केले, त्या मुंबईतील अँटॉप हिल, चेंबूर आणि टिळक नगर येथील रहिवासी आहेत. आझाद मैदान पोलिसांना तपासादरम्यान असं आढळून आलं की, आरोपीनं नोएडा आयपी अॅड्रेस असलेली सिस्टम वापरली होती.

सध्या हे प्रकरण दक्षिण क्षेत्र सायबर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलं आहे. डीसीपी बलसिंग राजपूत, एसीपी रामचंद्र लोटलीकर, वरिष्ठ पीआय किरण जाधव आणि पीएसआय प्रकाश गवळी यांच्या नेतृत्वाखालील पथकानं गुप्त माहिती गोळा केली. आरोपी राजा बाबू शाह याला यूपीतील गाझियाबाद येथून अटक करण्यात आलीये. तो यूपीमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. शाहाची पत्नी मुंबईत काम करते. तिनं पासपोर्टसाठी अर्ज केला होता.