'भारती'ने भरवली भुतांची 'पिकनिक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'भारती'ने भरवली भुतांची 'पिकनिक'

'भारती'ने भरवली भुतांची 'पिकनिक'

मुंबई : विद्यार्थी संघटनात नावारूपास आलेली ध्येयवादी विद्यार्थ्यांची तत्वनिष्ठ संघटना म्हणजेच विद्यार्थी भारती होय.
विद्यार्थी भारती संघटनेनं आजपर्यंत अनेक संघर्षात्मक तसेच रचनात्मक कार्यक्रम राबविले आहेत. त्यातीलच एक म्हणजे भुतांची पिकनिक. सालाबादप्रमाणे नवीन ठिकाण निवडून वाशिंद येथील गिरसे गावातील स्मशानात रात्री भुतांची पिकनिक पार पाडली.  

वर्षातील सर्वात भयानक, वैरी रात्र म्हणजे गटारी अमावस्या रात्रीच्या निरव शांततेत, झाडाझुडपांची सळसळ, अंधारलेल्या भयावह रात्रीत सावल्यांचे विदारक सावट!मनातली धडधड आणि फक्त भीती !

या रात्री सर्वात जास्त भूते बाहेर पडतात. मग ती झपाटतात आपल्यातल्या काही लोकांना म्हणून या रात्री कोणी बाहेर पडू नये असे सांगितले जाते, असे म्हणतात. या रात्री निघणारी भूत फार भयंकर असतात. ही व यांसारख्या अंधश्रद्धा समाजात मोठ्या प्रमाणात तगधरून बसल्या आहेत. मात्र, या अंधश्रद्धेला मोडीत काढण्यासाठी विद्यार्थी भारतीने नेमक्या याच रात्री वाशिंड येथील गिरसे गावातील स्मशानात काढली. भुताची पिकनिक, जेथे 200 च्यावर तरुण-तरुणींनी हजेरी लावली.

या कार्यक्रमांचे उद्घाटन विद्यार्थी भारती राज्यअध्यक्षा मंजिरी धुरी यांच्या हस्ते झाले व त्यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात चाललेल्या अंधश्रद्धा, जातिवाद ,खाजगीकरण, याकडे कशा पध्दतीने हिंसक वळण येत आहे हे थांबवण्याची गरज आम्हा तरुण पिढीची आहे व हे सगळे थांबण्यासाठी आपल्याला पुढे आलं पाहिजे लढत पाहिजे आणि जोपर्यंत दाभोलकर , कुलबुर्गी, पानसरे, गौरीलंकेश यांच्या खुनाचा तपास लागत नाही, तोपर्यत विद्यार्थी भारतीदेखील अहिंसक मार्गाने या सरकारकडे जबाब मागत राहणार असल्याचे ठाणा सचिव विनीत गांगुर्डे यांनी सांगितले.

साऱ्या नि मिळून 'भूता भूता बाहेर ये म्हणत' भुताला आमंत्रण दिले पण भूत काही आलेच नाही. अंनिसच्या राजू कोळींनी विद्यार्थ्यांना प्रयोगांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून भूत, प्रेत, गंडे, दोरे, चेटूक या सर्व अंधश्रद्धांना मोडून काढले.

फुले ,शाहू,आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर!
म्हणतं अंधश्रद्धाच्या भुतांना हाणून काढले!

समाजातील अंधश्रद्धा मिटवण्यासाठी तरुणांनी रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे ,असे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे विद्यार्थी भारतीचे ठाणे अध्यक्ष सर्वेश लवांडे यांनी सांगितले .

आपण समाजाच्या प्रति काही देणं लागतो. आपणच आपल्या समाजासाठी या देशासाठी काहीतरी करून दाखवले पाहिजे, असे मत विद्यार्थी भारतीच्या विद्यापीठ कार्यवाह साक्षी भोईर यांनी व्यक्त केले.