esakal | #MahaBudget2020: अर्थसंकल्पात मुंबईसाठी 'या' महत्वाच्या तरतुदी.... 
sakal

बोलून बातमी शोधा

#MahaBudget2020: अर्थसंकल्पात मुंबईसाठी 'या' महत्वाच्या तरतुदी.... 

मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मांडण्यात आला. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडीच्या सरकारकडून अनेक महत्वाच्या घोषणा यात करण्यात आल्या आहेत. 

ठाकरे सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात क्रीडा, शेतकरी कर्जमुक्ती, रस्तेबांधणी, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आलं. मुंबईच्या पर्यटन विकासासाठीही या अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. 

मुंबईसाठी या अर्थसंकल्पातील तरतूदी: 

#MahaBudget2020: अर्थसंकल्पात मुंबईसाठी 'या' महत्वाच्या तरतुदी.... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मांडण्यात आला. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडीच्या सरकारकडून अनेक महत्वाच्या घोषणा यात करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा: मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे काही चमत्कारिक फायदे... 

ठाकरे सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात क्रीडा, शेतकरी कर्जमुक्ती, रस्तेबांधणी, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आलं. मुंबईच्या पर्यटन विकासासाठीही या अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. 

मुंबईसाठी या अर्थसंकल्पातील तरतूदी: 

 • मुंबईत पर्यटनासाठी दर वर्षी १०० कोटी रुपये देणार. 
 • देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हाजीअली परीसराचा विकास आराखडा तयार करणार.
 • वरळी दुग्ध शाळेत आंतराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल उभारण्यासाठी १००० कोटी रुपये देण्यात येणार. 
 • आंतराष्ट्रीय दर्जाचं मत्सालय उभारण्यात येणार. 
 • 'मणीभवन' या वास्तूच्या आणि संग्रहालयाच्या नूतनीकरणकरण्यासाठी २५ कोटी रुपये.
 • मुंबई विद्यापीठात मागासवर्गीय महिलांसाठी ५०० निवासी क्षमतेचे वसतिगृहं उभारणार. 
 • बांधकाम क्षेत्र आणि घर खरेदीला चालना देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात एकदंरीत मुद्रांक शुल्कात दोन वर्षांसाठी १ टक्के सवलत देणार .
 • मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसिध्दीसाठी  मुंबईत मराठी भाषा भवन बांधणार. 
 • वडाळ्याला जीएसटी भवन बांधणार त्यासाठी ११८९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 • येत्या काळात एसटी महामंडळाच्या ताफ्यातल्या जुन्या बस बदलून १६०० नवीन बस देण्याचं नियोजन.
 • बस डेपो विकासासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद.
 • तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यासाठी ५ कोटींची तरतूद. 
 • मुंबई मराठी ग्रथंसंग्रहालय या संस्थेला १२५ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल डिजिटायझेशन करण्यासाठी ५ कोटी रुपयांचं अनुदान देणार.
 • एशियाटिक सोसायटीलाही विशेष अनुदान देणार.

हेही वाचा: आता 'कोरोना' तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही कसा?...'असा'.. 

अशा प्रकारच्या तरतुदी या अर्थसंकल्पात मुंबईसाठी करण्यात आल्या आहेत. 

gifts given by state government to mumbai  in maharashtra budget session 2020