Girish Mahajan: तरुणांमधील व्यसनाधीनता कर्करोगासाठी कारणीभूत; गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

Girish Mahajan News
Girish Mahajan Newsesakal

Cancer News : तरुणांमधील व्यसनाधीनता कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. महाराष्ट्र -वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्हेंशन सेंटरमध्‍ये तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेस कार्यक्रमात ते बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले, ‘‘बदलत्या जीवनशैलीचे कारण देत वाढत चाललेली व्यसनाधीनता हा महानगरांमध्येच नव्हे तर इतर शहरे व ग्रामीण भागातही चिंतेचा विषय ठरत आहे. सिगारेट, दारूसारख्या व्यसनांसह अफू, गांजा, ड्रग्स, खर्रा, ताडी-माडी, तंबाखू, तपकीर, गुटखा अशा विविध प्रकारच्या व्यसनांमध्ये आजची तरुणपिढी गुरफटत चालली आहे व हेच कारण कर्करोगाच्या वाढीला कारणीभूत ठरत आहे.

Girish Mahajan News
Cancer Patient : आयुर्वेद रसायनांनी सुधारले कर्करुग्णांचे आयुष्य

भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश असून यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे भारताच्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहणे ही आजच्या काळाची गरज आहे, यामध्ये शिक्षक, पालक, तसेच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे महत्त्‍वाचे आहे, असेही महाजन यांनी या वेळी सांगितले.

कॅन्सरचे निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या देशभरात वाढत असून या आजारावरील उपचारांमध्ये अनेक आधुनिक बदल झाले आहेत. इंडियन कॅन्सर काँग्रेस ही एक वैद्यकीय परिषद असून भारतातील चार सर्वात ऑन्कोलॉजी सोसायटींच्या मदतीने एकत्रितपणे राबवली जाते, ज्यामध्ये भारतातील सर्जिकल, रेडिएशन आणि वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट, तसेच ऑन्को-पॅथॉलॉजिस्ट, ऑन्को-रेडिओलॉजिस्ट विभागातील भारतातील प्रमुख तज्‍ज्ञ सहभाग घेतात.

- डॉ. संजय शर्मा, अध्‍यक्ष, इंडियन कॅन्सर काँग्रेस

दर चार वर्षांनी परिषद

इंडियन असोसिएशन ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजी, इंडियन सोसायटी ऑफ ऑन्कोलॉजी, इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल ॲंड पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी आणि द असोसिएशन ऑफ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट ऑफ इंडिया या चार संस्थांद्वारे दर चार वर्षांनी इंडियन कॅन्सर काँग्रेसचे आयोजन केले जाते. इंडियन कॅन्सर काँग्रेसची पहिली परिषद दिल्ली २०१३ मध्ये, तर दुसरी बंगलोर येथे २०१७ मध्‍ये व तिसरी मुंबईत यंदा २ ते ५ नोव्हेंबरदरम्‍यान पार पडली.

१०० कंपन्‍यांचा समावेश

कोविड महामारीमुळे तिसऱ्या परिषदेला दोन वर्षे विलंब झाला. या परिषदेत दोन हजारांहून अधिक तज्ज्ञांनी यात सहभाग घेतला असून कर्करोगावरील औषधे, तसेच वैद्यकीय तंत्रज्ञान बनविणाऱ्या भारतातील व विदेशातील १०० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.

Girish Mahajan News
Breast Cancer : स्तनाचा कर्करोग आणि उपाय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com