डोंबिवली - नदीच्या किनारी सुरू असलेले शूटिंग बघण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला रात्रभर दुकानात डांबून तिच्यावर दुकानदाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण जवळील आंबिवली परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात दुकानदार गणेश म्हात्रे (वय 21) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गणेशला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.