esakal | मोरबे धरणाला ‘...या’ नेत्याचे नाव देण्याची मागणी!
sakal

बोलून बातमी शोधा

मोरबे धरणाला ‘...या’ नेत्याचे नाव देण्याची मागणी!

नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाला ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोरबे धरणाला ‘...या’ नेत्याचे नाव देण्याची मागणी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महापालिकेच्या मोरबे धरणाला ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी महापौर व नगरसेवक सुधाकर सोनवणे यांनी सर्वसाधारण सभेत ठरावाच्या सूचनेद्वारे ‘गणेश नाईक जलाशय’ असे नामकरण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. २००२ च्या काळात अतिशय विरोध होत असतानाही नाईक हे धरण खरेदी करण्यावर ठाम होते. नाईक यांच्या या दूरदर्शी निर्णयामुळे नवी मुंबईला मुबलक पाणीपुरवठा होत असल्याचे सोनवणे यांचे मत आहे. 

हे वाचलं का?- रेल्वेची खानपान सेवा महागणार

राज्य सरकारने खालापूर येथील चौक गावाजवळ असणारे मोरबे धरण २००२ ला विक्रीसाठी काढले होते. हे धरण ज्या जिल्ह्याच्या हद्दीत होते. त्या जिल्ह्यातील नगरपालिका व महापालिकांनी खरेदी करण्यास असमर्थता दर्शवली होती. मात्र, त्याकाळी फारशी आर्थिक ताकद नसतानाही महापालिकेने मोरबे धरण खरेदी करण्याचा निर्णय घेतला. गणेश नाईक तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी सरकारचे मंत्री होते. माजी खासदार संजीव नाईक हे त्यावेळी महापालिकेचे महापौर होते. नवी मुंबईतील राष्ट्रवादीची सर्व सूत्रे नाईकांच्या हातात असल्यामुळे नाईकांनी संजीव नाईक यांच्यामार्फत धरण खरेदीचा प्रस्ताव मंजूर करून ३७० एमएलडी पाणी रोज पुरवठा करणारे मोरबे धरण खरेदी करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने हे धरण खरेदी केल्यामुळे राज्यभरात दुष्काळ असताना नवी मुंबई शहरात मात्र सर्व नळांना पाणीपुरवठा अविरतपणे सुरू असतो. 

हे वाचलं का?- महामुंबईतील नागरिकांवर नव्या कराचा बोजा?

शिवसेनेचा विरोध 
नाईक यांचे नाव मोरबे धरणाला देण्याच्या मागणीला शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेनेचे सर्व नगरसेवक या मागणीला सभागृहात कडाडून विरोध करतील, असे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले. देशात एवढे महापुरुष असताना तसेच असामान्य काम केलेले विद्वान नेते मंडळी असताना गणेश नाईक यांचे नाव देणे मान्य नाही. ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत, न्यायालयात खटले सुरू आहेत; अशा व्यक्तींचे नाव देणे म्हणजे अपरिपक्वतेचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.

आमदार गणेश नाईकांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई शहर घडले आहे. त्यांनी इच्छाशक्ती दाखवली म्हणून महापालिकेला सध्या अच्छे दिन आले आहेत. अन्यथा धरण खरेदी करण्याच्या निर्णयात अनेकांनी विरोध केला होता. हा निर्णय कसा चुकीचा आहे, हे सांगितले जात होते. मात्र, नाईकांनी घेतलेल्या निर्णयामुळे या धरणाला त्यांचे नाव दिले पाहिजे. 
- सुधाकर सोनवणे, नगरसेवक.

loading image
go to top