esakal | महाराष्ट्रातील स्थिर सरकारसाठी स्थापन होणार 'सुप्रीमकमिटी'
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रातील स्थिर सरकारसाठी स्थापन होणार 'सुप्रीमकमिटी'

महाविकासआघाडी राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी एक 'सुप्रीमकमिटी' स्थापन करणार आहे.

महाराष्ट्रातील स्थिर सरकारसाठी स्थापन होणार 'सुप्रीमकमिटी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाविकासआघाडी राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी एक 'सुप्रीमकमिटी' स्थापन करणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे या कमिटीचे सदस्य असणार आहेत. किमान समान कार्यक्रमावर हे तिन्ही नेते लक्ष ठेवणार आहेत.

दरम्यान, महाविकासआघाडीचं ठरलंय, उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेशी चर्चा करणार आहेत. राज्यात शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झालीय. या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा पूर्ण झाल्याचं सांगत दोन्ही पक्षांचं अनेक मुद्यावर एकमत झाल्याचंही स्पष्ट केलंय.

आता मुंबईला जाऊन मित्रपक्षांशी चर्चा करणार आणि त्यानंतर शिवसेनेशीही उद्या चर्चा करणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. शिवसेनेशी चर्चेनंतर सर्व बाबी पत्रकारसमोर  मांडण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे. 

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत वादळ ? 

महाशिवआघाडीच्या सरकारची शक्यता दृष्टीपथात आल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाबाबतची चर्चा सुरू झालीय. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी शिवसैनिकांची जरी इच्छा असली तरीही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत वादळ निर्माण होऊ शकतं.

WebTitle : to give stable government mahavikas aaghadi may form supreme committee