'ग्लोबल टीचर' पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले कोरोना पॉझिटिव्ह; मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची घेतली होती भेट

'ग्लोबल टीचर' पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले कोरोना पॉझिटिव्ह; मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची घेतली होती भेट

मुंबई : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे यूनेस्कोचे 'ग्लोबल टीचर' पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. डिसले गुरुजी गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या दौऱ्यावर होते. मुंबईत डिसले यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या होत्या. अनेक माध्यमांना देखील रणजितसिंह डिसले यांनी मुलाखती दिल्या होत्या.

दरम्यान रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्वतः 'ग्लोबल टीचर' पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांनी सांगितलं आहे. "लक्षणे दिसून आल्याने मी कोरोनाची टेस्ट करून घेतली. ती पॉझिटिव्ह आलेली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची टेस्ट करून घ्यावी", असं आवाहन रणजितसिंह डिसले म्हणाले आहेत. आपल्या WhatsApp वर डिसले यांनी तसं स्टेस्टेस ठेवलं आहे.  

गेल्या काही दिवसात डिसले गुरुजी मुंबईत होते. मुंबईत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री तसेच इतर विविध मंत्री तसेच नेत्यांची भेट घेतली होती. रणजितसिंह डिसले यांनी अनेकांना भेटी देखील दिल्यात. मुंबईतील जवळजवळ सर्व माध्यमांना डिसले यांनी मुलाखती देखील दिल्या आहेत.

रणजितसिंह डिसले यांनी शिक्षणात QR कोड सिस्टीम आणून आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यानंतर नवीन QR कोड पद्धती देशात सोबतच जगात वापरली गेली. याची दखल यूनेस्कोकडून घेण्यात आली आणि डिसले यांना 'ग्लोबल टीचर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

global teacher award winner ranjitsingh disle tested corona positive met CM uddhav thackeray few days back

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com