रात्री उशिरा घरी जाण्यासाठी गाडी मिळत नाहीये, वाचा ही 'युक्ती'

रात्री उशिरा घरी जाण्यासाठी गाडी मिळत नाहीये, वाचा ही 'युक्ती'

हैदराबाद : कित्येकदा रात्री घरी परतत असताना आपल्याला लवकर कोणतीच गाडी मिळत नाही, यावेळी अगदी टॅक्सी आणि रिक्शावाल्यांच्या पाया पडणंच बाकी असतं. मात्र या अडचणीवर मात देण्यासाठी हैद्राबादच्या ओबेशने थेट झोमॅटोचीच मदत घेतली आहे. ही संपूर्ण माहिती त्याने फेसबुक आणि ट्विटरद्वारे शेअर केली असून त्याची ही शक्कल वाचून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

ओबेशने केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहीले आहे की, "रात्रीचे 11.50 वाजले होते आणि मी घरी निघोलो होतो. दरम्यान मी इनऑर्बिट मॉलजवळील रोडवर असताना मला एकही रिक्शा किंवा टॅक्सी मिळत नव्हती. ओला-उबेरचे भाव पाहिले तर ते खूप जास्त होते,  त्यामुळे मी झोमॅटो ओपन केले आणि माझ्या लोकेशन जवळ असणा-या एका फूड शॅाप मधून माझ्या घरच्या पत्त्यावर डिलेव्हरी करण्यासाठी काही पदार्थ मागवले, जसा डिलेव्हरी बॅाय माझी ऑर्डर घेऊन निघाला मी लगेचच त्याला थांबवत मीच ऑर्डर केल्याचे सांगितले व त्याला ज्या पत्त्यावर डिलेव्हरी द्यायची आहे तिथे मला सोडशील का? असे विचारले यावर त्याने होकार देत मला माझ्या ऑर्डरसोबत घरी सोडले." 

अशाप्रकारे ओबेशने घरी जायचे भाडे देखील वाचवले आणि त्याचे पोट देखील भरले. यानंतर त्याने झोमॅटोचे सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आभार मानले व आपला किस्सा ही इतरांशी शेअर केला. विशेष म्हणजे झोमॅटोने देखील या पोस्टला रिप्लाय देत आधुनिक समस्या सोडविण्यासाठी आधुनिक समाधानाची गरज आहे, असा रिप्लाय दिला आहे. या सर्व ट्विस्ट्समुळे ओबेशची ही पोस्ट सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली आणि कित्येक युजर्सनी ती शेअर करत रिप्लाय देखील पोस्ट केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com