कोरोनाच्या काळात कल्याण डोंबिवलीतून आली आनंदाची बातमी...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर या भागांमध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई : ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर या भागांमध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील उपनगरांमध्ये कडक लॉकडाऊन पाळला जातोय. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचं प्रमाण मोठंय. मात्र अशातही एक पॉझिटिव्ह बातमी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामधून समोर येतेय. 

कल्याण पूर्वेतील दुर्गा माता रोडवरील एका कुटुंबातील एका व्यक्तीसह त्याच्या घरातील तीन मुलं आणि १०४ वर्षीय वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली. २१ तारखेला आधी या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर २३ तारखेला त्यांच्या वडिलांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं.  

मोठी बातमी मुंबईतील कोरोना कधी नियंत्रणात येणार? BMC म्हणतेय काळजी  करू नका, 'या' महिन्यात...

पॉझिटिव्ह बाब म्हणजे या १०४ वर्षीय आजोबांनी कोरोनाला हरवलंय. तब्बल ११ दिवसानंतर आनंदी झा या १०४ वर्षीय आजोबांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. त्यांना काल संध्याकाळी डिशचार्ज देण्यात आलाय. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर या आजोबानी कोरोनावर मात केल्याने झा कुटुंबामध्ये आणि ते राहत असलेल्या परिसरात आनंदाचं वातावरण आहे. काल त्यांना घरी सोडल्यावर परिसरातील नागरिकांनी या आजोबांचं आनंदाने स्वागत केलंय.  

लॉक डाऊन शिथिल केल्याने कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन पाळला जातोय. 

good news comes from kalyan dombivali municipal corporation 104 years old recovered from covid


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news comes from kalyan dombivali municipal corporation 104 years old recovered from covid