Vande Bharat: गजानन महाराजांच्या भाविकासांठी आनंदाची बातमी; आता शेगावसाठी धावणार वंदे भारत एक्सप्रेस

VandeBharat shegaon
VandeBharat shegaonsakal

देशातील अतिशय शिस्तबद्ध, स्वच्छतेबाबत विलक्षण आग्रही असे शेगावचे गजानन महाराज देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून दररोज लाखोंच्या संख्येने भाविक गजानन महाराजांच्या देवस्थानाला भेट देतात.

भाविकांचा प्रवास आरामदायी आणि जलद करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील सूचनेचा प्रस्तावसुद्धा मध्य रेल्वेकडून मागवण्यात आल्याची माहिती ‘सकाळ’ला मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

VandeBharat shegaon
Vandebharat :वंदे भारत एक्स्प्रेस तोट्यात जाण्याची चिंता, तिकीट दर कमी होणार ?

रेल्वे मंत्रालय मे २०२४ पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या ३० ते ३५ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे. सर्व काही योजनेनुसार झाले, तर नव्या वर्षात वंदे भारत गाड्यांद्वारे बहुतांश पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचता येईल. भारतातील सर्व धर्मांची जवळपास सर्व प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे या ट्रेनच्या सेवेने जोडली गेल्यास यातून रेल्वेला मोठा महसूलही मिळणार आहे.

भारतीय रेल्वेने सर्व झोनना पत्र पाठवून कोणत्या मार्गावर वंदे भारत चालविता येईल, यासंदर्भात सूचना मागितल्या होत्या. त्यावर मध्य रेल्वेने ३३१ किलोमीटर अंतराच्या मुंबई ते संभाजीनगर, ५६२.९ किमी अंतराच्या पुणे ते सिकंदराबाद, ५५४ किलोमीटर अंतराच्या मुंबई ते शेगाव आणि ४७० किलोमीटर अंतराच्या पुणे ते शेगाव रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला. या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाने चर्चा केली असून मुंबई ते शेगाव दरम्यान वंदे भारत ट्रेन चालविण्याचा विचार सुरू आहे.

VandeBharat shegaon
Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसला कराड, सांगलीला थांबा द्या; खासदार श्रीनिवास पाटीलांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

अमृत भारत योजना

भारतीय रेल्वेने अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचा कायपालट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शेगाव रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. त्यामुळे शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेवर आणखी दोन गाड्या

सध्या देशभरात ३४ वंदे भारत ट्रेनच्या ६८ फेऱ्या आहेत. महाराष्ट्रात सध्या सहा वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. त्यात एकट्या मध्य रेल्वेवर पाच वंदे भारत आहेत. यात मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदूरदरम्यान धावतात. आता आणखी दोन वंदे भारत ट्रेन मध्य रेल्वेवर दाखल होणार आहेत.

VandeBharat shegaon
Vande Bharat Train Food: वंदे भारत ट्रेनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण; प्रवाशांच्या वाढल्या तक्रारी!  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com