मुंबईकरांनो, तुमचा लाडका वडापाव तुमच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज...

मुंबईकरांनो, तुमचा लाडका वडापाव तुमच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज...

मुंबई- मुंबईची जान म्हणजे मुंबईचा वडापाव. मुंबईकर आणि मुंबईचा वडापाव यांच नातं काही वेगळंच. प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा तसंच पोट भरणारा पदार्थ मुंबईचा वडापाव दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. मुंबईकरांनी या दोन महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त काय मिस केलं असेल तर तो मुंबईचा वडापाव... तोच वडापाव आता मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. 

लॉकडाऊनच्या काळात शहर आणि उपनगरात सर्वच दुकान बंद होती. अनलॉक- 1 च्या नियमावलीत खाद्यपदार्थ विक्रीला सूट देण्यात आली. त्यानंतर दुकान सुरु होताच ग्राहकांनी वडापाव, समोसा सारख्या खाद्यपदार्थांवर ताव मारला आहे. मात्र मुंबईकर गाडीवरचा वडापाव आणखी काही दिवस मिस करतील. कारण मुंबईतील हात गाडीवरील वडापाव विक्रेत्यांना अद्याप विक्रीस मनाई करण्यात आली आहे.

दुकानांवर ग्राहकांची तोबा गर्दी 

तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन ग्राहकांना दुकानांबाहेर वडापाव खाण्यासाठी गर्दी केली. दरम्यान व्यवसाय सुरु झाल्यानं विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आता हास्य उमटणार आहे. मुंबईत गाडीवरचा वडापाव असो की, दुकानांतील सर्वच वडापावच्या दुकानांवर तुम्हाला गर्दी बघायला मिळणारच. त्यात दादरचा श्रीकृष्ण वडापाव असो किंवा जम्बो किंगचा सगळीकडे आता मुंबईकरांची गर्दी होणार आहे. 

वडापावची अशीही विक्री 

लॉकडाऊनच्या काळात काही वडापाव विक्रेत्यांनी घरात बसूनही विक्री केली आहे. तसंच अजूनही कंन्टेमेंट झोन असलेल्या ठिकाणीही विक्रेत्यांनी Take Away ची सुविधा सुरु केली आहे. आजूबाजूच्या परिसरात व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवून विक्रेत्यांनी वडापावची एकत्रित ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. म्हणजेच एकदाच बल्कमध्ये ऑर्डर आल्यानंतर विक्रेते त्यांच्यासाठी वडापाव बनवून देतात. यामुळे विक्रेत्यांची गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. 

मिम्स व्हायरल 

लॉकडाऊनच्या काळात बाहेरचे सर्वच पदार्थ बंद होते. त्यामुळे बरेच लोकं वडापाव खूप मिस करत होते. घरी बनवलेला वडापाव आणि बाहेरच्या गाडीवर मिळणारा वडापाव यात बराच फरक असतो. त्यामुळे याकाळात वडापावची आठवणीत आतुर झालेल्यांचे मिम्सही बरेच व्हायरल झाले होते.

good news mouth watering vada pav shops are now open in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com