esakal | good-news-mumbai-more-eleven-thousand-corona-patient-discharge-today-429895

बोलून बातमी शोधा

corona testing

कोरोना संकटात मुंबईकरांसाठी एक चांगली दिलासादायक बातमी

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी आज एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत आज ७ हजार ८९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. पण पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

मुंबईत आज ११ हजार २६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मुंबईचा रिकव्हरी रेटही वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईचा रिकव्हरी रेट ७९ टक्के होता. तो आता ८१ टक्के झाला आहे. कोरोनामुळे आज २६ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ८६ हजार ८६६ आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधीही ३६ वरुन ३८ दिवस झाला आहे. मुंबईत आज ४९ हजारपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या.