राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच वेतन आणि दिवाळी बोनस मिळणार

तुषार सोनवणे
Monday, 9 November 2020

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिण्यांपासून वेतन थकीत आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत होता.

मुंबई - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिण्यांपासून वेतन थकीत आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत होता. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि बोनस लवकरच देण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

हेही वाचा - विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिण्यांपासून वेतन मिळालेले नाही. कोरोनाच्या संकटामुळे एसटी महामंडळाचा आर्थिक गाडा पूर्णपणे कोंलमडला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात महत्वाची सेवा दिली. तरीदेखील त्यांचे गेल्या तीन महिण्यांपासून वेतन राज्य सरकारने थकवले होते. त्यातच आता दिवाळीसारख्या सणाला तरी सरकारने कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे यासाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश पाहयला मिळत होता. राज्यातील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे देखील समोर आले आहे.

हेही वाचा - अर्णब गोस्वामी यांना उच्च न्यायालयाचा दणका! जामीन नाकारत सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे थकित तीन महिण्यांच्या वेतनापैकी, एक महिण्याचे वेतन आणि दिवाळीचा अग्रिम भत्ता लगेच जमा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. तसेच दुसऱ्या महिण्याचा भत्ता दिवाळीच्या आधी जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांच्या एकून थकीत तीन महिन्याच्या वेतनापैकी 2 महिन्याचे वेतन आणि दिवाळीची अग्रिम रक्कम एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार आहे. कर्मचाऱ्यांनी संयम बाळगावा, कोरोनाच्या काळातून राज्य सरकार सावरत आहे. त्यामुळे कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहनही परब यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for ST employees in the state Get salary and Diwali bonus soon