esakal | कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांसाठी खुश खबर; मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांसाठी खुश खबर; मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून मिळणार सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांसाठी खुश खबर; मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय

sakal_logo
By
प्रशांत बारसिंग


मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून मिळणार सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

मोठी बातमी! प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली ही माहिती; वाचा सविस्तर

एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरीकांनी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असे शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

मोठी बातमी : "अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता", राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतायत हे जाणणाऱ्या नेत्याने केली सूचक कमेंट

सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी  आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी  दिल्या.

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )