
महाराष्ट्राच्या सध्या एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडवली आहे. जत तालुक्यातील ८२ वर्षीय शेतकरी आजी विठाबाई पडळकर यांच्या १७ एकर जमिनीवर डोळा ठेवून त्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यावर थेट आरोप शेतकरी आजी विठाबाई यांनी केले आहेत. विधानभवनाबाहेर या शेतकरी कुटुंबाने आंदोलन करत आपला आक्रोश व्यक्त केला आहे.