
Devendra Fadnavis' First Reaction on the Vidhan Bhavan Clash: विधिमंडळाच्या लॉबीत आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आणि मोठा राडा झाला. यावेळी एकमेकांचे कपडेही फाडण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
विरोधकांनी या घटनेवरून सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे. शिवाय, टीका-टिप्पणीही सुरू झाली आहे. आमदार आव्हाडांनीही या गंभीर घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त करत, विधिमंडळात आमदारच सुरक्षित नाहीत, असा आरोप केला आहे. तर या घटनेवर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीडियाला या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘’घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. अशाप्रकारे इथे घटना घडणं हे अजिबात योग्य नाही. या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो. त्यामुळे अध्यक्ष आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि यासंदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई अध्यक्षांनी करावी अशाप्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे.’’
तसेच, ‘’मला असं वाटतं की अशाप्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्याप्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात. हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहीजे.’’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.