शासकीय’ पुस्तके ऑनलाइन विक्रीसाठी अनुपलब्ध

‘आयएसबीएन’ क्रमांकाचा अभाव; संकेतस्थळही नसल्याने वाचकांची निराशा
पुस्तक (Book):
.
पुस्तक (Book): .sakal
Updated on

मुंबई: राज्यातील महापुरुषांचे चरित्र, कार्ये, इतिहास, चरित्र ग्रंथ, साहित्य, सांस्कृतिक प्रकाशने, संशोधन आदी विषयांवरील शेकडो पुस्तके, ग्रंथ राज्य शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयाच्या माध्यमातून प्रकाशित केली जातात. त्यांची विक्रीही केली जाते. मात्र, त्यासाठी पुस्तक आणि ग्रंथाला आयएसबीएन (इंटरनॅशनल स्टॅंडर्ड बुक नंबर) क्रमांक न घेतल्याने पुस्तके ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकलेली नाहीत.

पुस्तक (Book):
.
Mumbai Water Taxi: मुंबई ते नवी मुंबई 'वॉटर टॅक्सी' सेवेचा शुभारंभ | Sakal Media |

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री आणि प्रकाशन संचालनालय शतकापासून कार्यरत आहे. आजवर महापुरुषांचे चरित्र ग्रंथ, साहित्य, सांस्कृतिक प्रकाशने, अधिनियम आणि नियम यांच्यासह विविध प्रकारची साडे तीन हजारांहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. साहित्य संस्कृती मंडळाचे ५४६ ग्रंथ, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे ३८ ग्रंथ, मराठी विश्वकोश मंडळाचे ११ खंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तक प्रकाशन समितीकडून २३ खंडांचे प्रकाशन केले आहे. ‘आयएसबीएन’ न मिळाल्याने ही पुस्तके ऑनलाइनसाठी उपलब्ध विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. यासाठी संकेतस्थळही नसल्याने वाचकांची निराशा होत आहे.

शासकीय मुद्रणालयाच्या सर्वच पुस्तकांना आयएसबीएन क्रमांक मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल. शासकीय मुद्रणालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेली सर्व पुस्तके जगभरातील वाचकांना ऑनलाइन उपलब्ध करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील.

पुस्तक (Book):
.
Rashmika Mandana in style at Mumbai Airport : पुष्पा फेम रश्मिका मंदनाचा comfy लूक....|

सुभाष देसाई, मंत्री, मराठी भाषा विभाग

सध्या ऑनलाइन पुस्तके उपलब्ध नसली, तरी आम्ही कुरिअरच्या माध्यमातून स्पीड पोस्टने पुस्तक पाठवणे सुरू करीत आहोत. शिवाय वर्षभरात संकेतस्थळही तयार केले जाईल.

- रू. दि. मोरे,

संचालक, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय

‘आयएसबीएन’

म्हणजे काय?

केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण व मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राजा राममोहन राय नॅशनल एजन्सी फॉर आयएसबीएन या संस्थेमार्फत इंटरनॅशनल स्टॅंडर्ड बुक नंबर म्हणजेच आयएसबीएन दिला जातो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या क्रमांकामुळे ऑनलाइन पुस्तक विक्री करणे सुलभ होते. पुस्तकाची नक्कल करणाऱ्यांना आळा बसतो. क्रमांकामुळे पुस्तकांची एक वेगळी ओळख असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com