कोरोनाशी लढण्याऐवजी कंगनाशी लढण्यात सरकार मश्गूल, भाजपची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाशी लढण्याऐवजी कंगनाशी लढण्यात सरकार मश्गूल, भाजपची टीका

राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असूनही 29 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांपैकी फक्त अर्धा टक्का तरतूद आरोग्य विभागासाठी करणाऱ्या राज्य सरकारवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे.

कोरोनाशी लढण्याऐवजी कंगनाशी लढण्यात सरकार मश्गूल, भाजपची टीका

मुंबई: राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असूनही 29 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांपैकी फक्त अर्धा टक्का तरतूद आरोग्य विभागासाठी करणाऱ्या राज्य सरकारवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे. कोरोनाकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार कंगनाचे घर पाडण्यात मश्गूल आहे, असाही टोला त्यांनी लगावला आहे. 

ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये आरोग्य विभागाकरिता केवळ 0.48 टक्के खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. यातली किती रक्कम कोरोनाविरुद्धच्या लढ्यात वापरण्यात येतील हे देखील सरकारने स्पष्ट केले नाही.  राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असतानाही एवढी नगण्य खर्चाची तरतूद केल्यामुळे राज्य सरकार कोरोनाच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत आहे,  अशीही टीका  भातखळकर यांनी केली आहे. 

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता आणि मुंबई व उपनगरातील रुग्णालयांना केवळ 50 कोटी, रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी केवळ 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुळात कोरोनामुळे राज्यातील जनता होरपळून निघत असताना ठाकरे सरकारकडून आरोग्य यंत्रणेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता होती. परंतु हे सरकार केवळ बदल्या करण्यात, त्यातून मलिदा कमविण्यात व कंगना राणावतचे घर पाडण्यात मश्गुल झाली आहे, असा टोला सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी मारला आहे.

-------------

(संपादनः पूजा विचारे)

Government busy fighting Kangana instead fighting Corona BJP criticizes

टॅग्स :Bjp