भारतीय तंत्राची मलेशियाला भुरळ! झाडांच्या संरक्षणासाठी वापरणार आपला एक नंबर 'देशी' फॉर्म्युला

भारतीय तंत्राची मलेशियाला भुरळ! झाडांच्या संरक्षणासाठी वापरणार आपला एक नंबर 'देशी' फॉर्म्युला

मुंबई : झाडांचे बुरशी, किडे आणि वाळवीपासून सरंक्षण करण्याचा भारतीय फॉर्म्युला आता मलेशीयातही वापरण्यात येणार आहे. मलेशीयाच्या केदाह राज्याचे सुलतान सालेहऊदीन इबनी अलमरहुम सुलतान बद्लीशाह यांना या भारतीय तंत्राची भुरळ पडली असून हीच पध्दत आता मलेशीयात वापरण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.

सुलतान सालेहऊदीन हे काही दिवसांपुर्वी मुंबई भेटीवर होते. तेव्हा त्यांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांना लाल आणि सफेद रंग लावलेला पाहिला. या रंगाचे कोडे त्यांना सुटत नसल्याने त्यांनी मायदेशी गेल्यावर थेट मुंबईतील मलेशीयातील वाणिज्यदुत जैनल अजलान मोहम्मद नादजिर यांना याबाबत माहिती घेण्याच्या सुचना केल्या.

जैनल यांनी भायखळा येथील विरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला भेट घेऊन पालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांची भेट घेतली. परदेशी यांनी जैनल यांना या रंगाबाबत माहिती दिली. लाल रंग हा गेरू आणि सफेद रंग हा चुन्याचा असतो. या दोन्ही रंगांमुळे झाडाचे वाळवी, बुरशी तसेच खोड किडी सारख्या किड्यां पासून संरक्षण होते. ही माहिती घेतल्यावर ही पध्दत मलेशीयातही वापरणार असल्याचे जैनल यांनी नमुद केले.

गेरूमध्ये अम्लीय गुणधर्म असतात तर चुन्यात अल्कधर्मी गुणधर्म असतात. त्यामुळे खोडांचे बुरशी, खोड किड्यासारखे किडे तसेच वाळवी पासूनही संरक्षण होते. साधारणत: जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी झाडांच्या खोडाला बुरशी लागण्याचा धोका असतो. त्याच बरोबर उन्हाळ्यात उन्हापासून आणि थंडीत थंडी पासून झाडांचे संरक्षण करण्याचे काम गेरू आणि चुना करतो.अशी माहिती परदेशी यांनी दिली.

government of malesia to use indian hack to save trees from various insect attack and fungus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com