सायन हॉस्पिटलच्या डीन यांना मृतदेह प्रकरण भोवलं, सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

सायन हॉस्पिटलच्या डीन यांना मृतदेह प्रकरण भोवलं, सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

मुंबई : सायन रुग्णालयातील मृतदेह प्रकरण भोवल्याने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रमोद इंगळे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ रमेश भारमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना संसर्ग वाढल्याने कोरोना रुग्ण आणि मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. रुग्णालये तुडुंब भरले असून एका रुग्णालयात दररोज साधारणता 7 ते 8 रुग्ण दगावत आहेत. दोन दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील कोरोना वॉर्ड मध्ये काही रुग्ण दगावले , मात्र त्यांचे शव काळ्या प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळून तसेच वॉर्ड मधील स्ट्रेचर वर पडून होते. शव असलेल्या स्ट्रेचर च्या बाजूलाच इतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ही होते. या प्रकारामुळे मृतदेहांची हेळसांड ता झालीच शिवाय संसर्ग पसरण्याचा धोका ही निर्माण झाला.

कोरोना वॉर्ड मधील या विदारक परिस्थितीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली. सायन रुग्णालयातील या प्रकारावरून सर्वच स्तरात संताप व्यक्त करण्यात आला. पालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी समिती नेमून तातडीने चौकशी सुरू केली. चौकशीत रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रमोद इंगळे यांना चांगलाच भोवला असून त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांची बदली बायोमेट्रिक विभागाच्या प्रमुख पदावर करण्यात आली आहे. त्यांच्याजागी पालिकेच्या प्रमुख रुग्णालायांचे संचालक डॉ रमेश भारमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ भारमल यांनी यापूर्वी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिले आहे.

government took decision to transfer of dean of sion hospital after unattended body in hospital 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com