उद्धव ठाकरेंना आला राज्यपालांचा फोन ; म्हणाले 'इथे भेटल्यावर ठरवू या वेळ'... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

राज्यपालांच्या कोट्यातुन आमदारकीसाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने पाठवला आहे. गेल्या काही दिवसापासून या प्रस्तावावर राज्यपालांची कधी सही होतेय याकडे सर्वांचे लक्ष आहे

मुंबई - राज्यात कोरोनाचे थैयमान कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या महामारीतून सावरण्यासाठी राज्याचे नेतृत्व करतानाच त्यांच्या खुर्ची भोवती वेगळीच राजकिय घडामोड घडतेय. ते महाआघाडीत मुख्यमंत्री तर बनले परंतु त्यांच्या आमदारकीच काय? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले असतानाच कालरात्री उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना एक फोन कॉल केल्याची माहिती पुढे आली आहे. 

राज्यपालांच्या कोट्यातुन आमदारकीसाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने पाठवला आहे. गेल्या काही दिवसापासून या प्रस्तावावर राज्यपालांची कधी सही होतेय याकडे सर्वांचे लक्ष आहे. राजभवनातून कधी काय निरोप येतो याकडे मातोश्रीची नजर असतानाच मातोश्रीवर कोणा कोणाचे फोन कॉल आले या यादीत चक्क भगतसिंह कोश्यारी यांचेही नाव आढळले. हा कॉल मुख्यमंत्रीसाहेबांनपर्यंत पोहचला की नाही अशीही विचारणा झाली. राज्यपाल महोदयांचा कॉल घेतला गेला नाही असे चित्र योग्य दिसणार नाही अशी त्यावेळी प्रतिक्रिया व्यक्त झाली. 

आता तिसरा लॉक डाऊन, कारण लॉक डाऊन आता जून पर्यंत वाढणार?

एवढ्यात पुन्हा राज्यपालांचा फोन कॉल मातोश्रीवर खणाणला. या दरम्यान नेमके काय घडले याची अटकळ बांधत राज्यपाल महोदय म्हणाले, की मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्यन्यायाधीश दत्ता यांना शपथ द्यायची आहे तेव्हा वेळ ठरवू या !  

सध्या आमदार नसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल कोश्‍यारी यांना भेटणार आहेत ते न्यायाधीशांच्या शपथविधि समारंभात. तेथे नेमकं काय घडेल अन् नेमकी कोणती वेळ ठरवली जाणार आहे ? हे त्यांच्या भेटीनंतरच राज्याला कळणार आहे. 

मुख्यंमत्र्यांच्या आमदारकीवरुन सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा आहे. ठाकरे यांना त राज्यपालांच्या कोट्यातली आमदारकी द्यायला ते सहजासहजी तयार नाही असेच एकुण चित्र रंगवले जात आहेत. 

3 मे नंतर लॉक डाऊन उठला तरीही पाळावेच लागतील 'हे' नियम, कारण कोरोनाची टांगती तलावर डोक्यावर असेल

या घडामोडीमुळे गेल्या काही दिवसांपासुन राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.आमदार म्हणुन निवडून न आले मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांना शपथविधी नंतर सहा महिन्यात दोन सभागृहा पैकी एका सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची टांगती तलवार आहे. यामुळे राज्यात परत राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. 

राज्यपालांच्या रिक्त कोट्यातुन उद्धव ठाकरे यांना आमदार करण्याचा प्रस्ताव अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तयार करुन मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे पाठवून ठाकरे यांना आमदार करण्याची विनंती राज्यपाल कोश्यारी यांना केली आहे. मात्र या प्रस्तावावर राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नाही.ते उद्धव ठाकरे यांच्या बद्दल कधी व काय निर्णय घेतात याकडे संपुर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. 

शिवसेनेचा जुना मित्र पक्ष भाजप उद्धव ठाकरेनां आमदारकीसाठी शुभेच्छा तर देतोय परंतु राज्यपालांच्या पातळीवर काही हातचे राखून राजकिय अडवणुक करतोय कि काय असे चित्र दिसत आहे. 

governor koshyari called cm udhav thackeray and said forst we will meet and then will decide time


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: governor koshyari called cm udhav thackeray and said forst we will meet and then will decide time