विरार - बोल बजरंग बली कि जय, गोविंदा आला रे आला,चे नारे देत पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणची दहीहंडी पथके विरार येथील नवीन विवा महाविद्यालयाकडे येत होती. याठिकाणी ५० संघाचा दहीहंडीचा थरार उपस्थितांना पाहायला मिळाला. रात्री उशिरा पर्यंत सुरु असलेल्या ह्या चाचणीत १६ संघाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.