
मुंबई : कोरोनासंकटामुळे लॉकडाऊन असल्याने मुंबईकरांना थेट शेतकऱ्यांकडून धान्य, भाज्या, फुले अशा वस्तू घरपोच मिळाव्यात यासाठी मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनने संकेतस्थळ सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी या माध्यमातून 300 गृहसंकुलांनी जीवनावश्यक साहित्य मागवले. मुंबईतील हजारो गृहनिर्माण संस्था व सदस्यांना http://mumbaihousingfederation.com/register-society.php या संकेतस्थळावरून भाजीपाला, फळे, फुले, अन्नधान्य आदी जीवनावश्यक साहित्य घरपोच मिळेल. या संकेतस्थळाचे उद्घाटन नुकतेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. यावेळी मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सचिव डी. एस. वडेर, खजिनदार डी. एन. महाजन, ज्येष्ठ संचालक वसंतराव शिंदे, छाया आजगावकर आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक सेवांचा तुटवडा भासत आहे. अशा स्थितीत गृहनिर्माण संस्थांपर्यंत भाजीपाला, फळे, फुले, अन्नधान्य पोहोचवण्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त ठरेल. त्यासाठी सरकार आणि फेडरेशनकडूनही मदत केली जाईल. अशाच पद्धतीने राज्यात प्रत्येक शहरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे दरेकर यांनी "सकाळ'ला सांगितले.
शेतकऱ्यांकडून बाजारभावापेक्षा कमी दरांत घरपोच भाजीपाला, अन्नधान्य मिळवण्यासाठी किमान 13 सदस्यांच्या सोसायटीने संकेतस्थळावर नोंदणी करून मागणी कळवायची आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून मिळालेली माहिती सोसायटीला दिली जाईल. टेम्पोतून माल आल्यावर लगेच पैसे द्यावे लागतील, अशी माहिती प्रकाश दरेकर यांनी दिली.
व्याप्ती वाढवणार
महाराष्ट्र राज्य सहकारी मंडळ व पणन खात्यातर्फे या योजनेचा समन्वय साधला जात आहे. पुणे, नाशिक, सिन्नर, पालघर, वसई येथील शेतमाल मुंबईकरांना मिळेल. नंतर या योजनेची व्याप्ती अन्य शहरांमध्ये वाढवली जाईल, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. सोसायटीने संकेतस्थळावर नोंदणी करून संकेतांक (कोड नंबर) मिळवल्यावर वैयक्तिक सदस्यांनाही मागणी कळवता येईल.
: Grains, vegetables, flowers will be home delivered directly from the farmers
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.