Grampanchayat Election | ठाणे जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींसाठी पाच केंद्रांवर मतमोजणी

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 17 January 2021

ठाणे जिल्ह्यातील एक ना अनेक कारणांनी ग्राम पंचायतींच्या निवडणुका गाजल्या. त्यात शुक्रवारी जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीतील 994 जागांसाठी उभ्या ठाकलेल्या दोन हजार 231 उमेदवारांचे नशीब मतपेटीत सीलबंद झाले

ठाणे  ः ठाणे जिल्ह्यातील एक ना अनेक कारणांनी ग्राम पंचायतींच्या निवडणुका गाजल्या. त्यात शुक्रवारी जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीतील 994 जागांसाठी उभ्या ठाकलेल्या दोन हजार 231 उमेदवारांचे नशीब मतपेटीत सीलबंद झाले. सोमवारी मतमोजणी असल्याने उमेदवारांचे नशिबाचा टाळ उघडणार असल्याने अनेकांनी रविवार पासूनच देव पाण्यात ठेवले आहे. तर, अनेक उमेदवारांनी विजयी झाल्यानंतर जल्लोषात मिरवणूक काढण्याचे नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्‍यात मतमोजणी होणार असल्याने मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसांनी तगडा बंदोबस्त देखील ठेवला आहे. 

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या सहा तालुक्‍यातील 158 पैकी 143 ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. मात्र, या निवडणुका दरम्यान, सर्वाधिक ग्रामपंचायत असलेल्या भिवंडी तालुक्‍यात हाणामारी, गोळीबार यांसारख्या घटना घडल्या. तर, कल्याण तालुक्‍यात स्मशानभूमीत पिठाच्या गोळ्यात उमेद्वारांच्या नावाच्या चिठ्ठ्या आढळून आल्या यासारख्या घटनांमुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतीनच्या निवडणुकांना गालबोट लागले. तर, जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायतीत प्रतिष्ठेच्या करण्यात आल्या होत्या. त्यातच सोमवारी या ग्रामपंचायतीच्या 994 जागांसाठी सकाळी 9 वाजल्यापासून पाच ही मतमोजणी केंद्रावर मतमोजणीस सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांच्या मनात धाकधूक सुरु झाली आहे. तर, अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तसेच अनेक उमेदवारांनी निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विजयी मिरवणुका काढण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी फेटे, हार तुरे, गुलाल आणि फटाक्‍यांची जमवाजमव देखील करण्यात येत आहे. 

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्‍यातील 158 ग्रामपंचायतींच्या एकूण एक हजार 472 जागांसाठी चार हजार 388 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननी प्रक्रियेत 183 उमेदवारी अर्ज बाद झाले. तर, एक हजार 546 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. याशिवाय, आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहे. तर, ठाणे तालुक्‍यातील दहीसर, पिपरी, नागाव, वाकळण आणि नारिवली या पाच ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. तर, दोन ग्राम पंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. त्यात सोमवारी ग्रामपंचायतींच्या मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण वातवरणात व कायदा सुव्यवस्था राखीत पार पडाव्यात यासाठी ठाणे ग्रामीण व ठाणे शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

  प्रत्यक्ष निवडणुका झालेल्या ग्रामपंचायत

 उमेदवार संख्या तालुका ग्रा.पं. संख्या उमेदवार संख्या 

कल्याण 20 381 
अंबरनाथ 26 375 
भिवंडी 53 1063
मुरबाड 39 341 
शहापूर 05 71 
     

 

Grampanchayat Election Counting of votes at 14 centers for 143 gram panchayats in Thane district

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grampanchayat Election Counting of votes at 14 centers for 143 gram panchayats in Thane district