
मुरबाड तालुक्यातील ग्राम पंचायत सदस्यांच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप समर्थक मोठ्या संख्येने निवडून आले असले तरी नक्की कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायतीमध्ये बहुमत मिळाले ते स्पष्ट झाले नाही
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ग्राम पंचायत सदस्यांच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप समर्थक मोठ्या संख्येने निवडून आले असले तरी नक्की कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायतीमध्ये बहुमत मिळाले ते स्पष्ट झाले नाही. 44 ग्रामपंचायतीपैकी शिवसेना नेते व ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी 32 ग्राम पंचायतीमध्ये सेनेला बहुमत मिळाल्याचे सांगितले. तर भाजप मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव यांनी 33 ग्राम पंचायतीमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचे सांगितले.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यातील एकूण 44 ग्रामपंचायतीच्या 338 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी पाच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले होते. एकूण 178 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. म्हणजेच बाकी 39 ग्रामपंचायतीतील उर्वरित 160 सदस्यांच्या मतदानाचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अद्याप सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाले नाही. त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यावेळी कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायतीमध्ये बहुमत मिळाले ते स्पष्ट होणार आहे.
Grampanchayat Election Result 39 Gram Panchayats in Murbad taluka announced