esakal | GrampanchayatElectionResult | भिवंडीत भाजपचे वर्चस्व महाविकास आघाडीवर मात
sakal

बोलून बातमी शोधा

GrampanchayatElectionResult | भिवंडीत भाजपचे वर्चस्व महाविकास आघाडीवर मात

भिवंडी तालुक्‍यातील 56 पैकी 30 ग्रामपंचायतींवर भाजपने निर्विवाद बहूमत मिळविले आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर मात केली आहे

GrampanchayatElectionResult | भिवंडीत भाजपचे वर्चस्व महाविकास आघाडीवर मात

sakal_logo
By
शरद भसाळे

भिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील 56 पैकी 30 ग्रामपंचायतींवर भाजपने निर्विवाद बहूमत मिळविले आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर मात केली आहे; तर आणखी चार ठिकाणी भाजपला युतीच्या माध्यमातून सत्ता मिळणार आहे. त्यामुळे तालुक्‍यातील एकूण 34 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. भिवंडीतील अनेक ग्रामपंचायत भागात शिवसेनेचे वर्चस्व संपुष्टात आले असून प्रतिष्ठेच्या काल्हेर, शेलार, पुर्णा ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

भिवंडी तालुक्‍यातील एकूण 56 ग्रामपंचायतींपैकी वळ, आलिमघर, निवळी आणि चिंचवली-खांडपे ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यात भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सहमती झाली होती. उर्वरित 53 ग्रामपंचायतींच्या निवडणूका चुरशीच्या मानल्या जात होत्या. भाजपविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्र आले होते; मात्र खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ग्रामपंचायतींवर निर्विवाद बहूमत मिळवले आहे. तालुक्‍यातील काल्हेर, शेलार या दोन्ही श्रीमंत ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. खासदार पाटील यांचे गाव दिवे अंजूरमध्येही भाजपाचा झेंडा फडकला. पुर्णा, माणकोली, पिंपळास, झिडके, कुकसे, ओवळी, लामज, लाखिवली, वडघर, डुंगे, जुनांदुर्खी, अंजूर, पिंपळनेर आदी ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत; तर खारगाव व निंबवली ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून भिवंडी तालुक्‍याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता; मात्र गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारकडून भिवंडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपाला मतदारांनी पसंती दिली. 
- कपिल पाटील,
खासदार, भिवंडी 

GrampanchayatElectionResult BJPs victory over most Gram Panchayats in Bhiwandi

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image