esakal | आजोबांचा नेम चुकला अन् नातवाला लागली गोळी; महाडमधील विचित्र घटना
sakal

बोलून बातमी शोधा

आजोबांचा नेम चुकला अन् नातवाला लागली गोळी; महाडमधील विचित्र घटना

आजोबांनी कुत्र्याला मारलेली बंदुकीची गोळी नेम चुकल्याने नातवालाच लागल्याने नातू गंभीर जखमी झाल्याची घटना महाड तालुक्यातील कोकरे येथे  घडली

आजोबांचा नेम चुकला अन् नातवाला लागली गोळी; महाडमधील विचित्र घटना

sakal_logo
By
सुनिल पाटकर


महाड - आजोबांनी कुत्र्याला मारलेली बंदुकीची गोळी नेम चुकल्याने नातवालाच लागल्याने नातू गंभीर जखमी झाल्याची घटना महाड तालुक्यातील कोकरे येथे  घडली. या प्रकरणी आजोंबांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

हेही वाचा - समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारणार, मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश

कोकरे गावातील 75 वर्षीय सेवानिवृत्त सैनिक यशवंत साळवी यांनी आपल्या  ताब्यातील एक नळी प्रकारातील बंदुकीने गावातील पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कुत्र्यावर धरलेला बंदुकीचा त्यांचा नेम चुकला आणि बंदुकीतून सुटलेली गोळी जवळच उभ्या असलेल्या त्यांच्या तीस वर्षीय कविराज अनंत साळवी  या त्यांच्या नातवाच्या कमरेला लागली. यात नातू गंभीर जखमी झाला आहे. या बाबत गावचे  पोलीस पाटील भीमराव धोत्रे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात यशवंत साळवी यांच्या विरोधात  गुन्हा दाखल केला आहे. 

Grandpa missed the mark and grandson was shot incident in Mahad

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top