esakal | ठाकरे सरकारला नाकीनऊ आणणाऱ्या सोमय्यांना जामीन
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे सरकारला नाकीनऊ आणणाऱ्या सोमय्यांना जामीन

ठाकरे सरकारला नाकीनऊ आणणाऱ्या सोमय्यांना जामीन

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नाकीनऊ आणणाऱ्या भाजपच्या किरीट सोमय्या यांना कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. अर्थ या सामाजिक संस्थेच्या वतीने सोमय्यांविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. त्याप्रकरणी मुंबईतील शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी पार पडली. दोन्ही वकिलांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सोमय्या यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोमय्यांना जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी कोर्टानं सोमय्या यांचा जबाब नोंदवला. सोमय्या यांनी यावेळी आपण दोषी नसल्याचं सांगितलं. याप्रकरणाची पुढील सुनानणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

एक एप्रिल 2021 रोजी गृहनिर्माण विभागाचे आधिकारी प्रवीण कलमे यांना सोमय्या यांनी गृहनिर्माण विभागाचा सचिन वाजे म्हणून संबोधलं होतं. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरए आणि म्हाडा या संस्थांमधून प्रवीण कलमे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिले होते, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांना प्रविण कलमे आणि अर्थ नावाच्या एका संस्थेकडून आवाहन देण्यात आलं आणि त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली. याप्रकरणी गेल्या सुनावणीवेळी मुंबईतील शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने सोमय्या यांना फटकारलं होतं.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या डझनभर आमदारांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार विरुद्ध सोमय्या असा वाद रंगला होता. त्यामुळे इतर नेत्यांच्या अडचणी वाढवणाऱ्या किरीट सोमय्या यांच्याही अडचणी सध्या वाढल्या आहेत.

loading image
go to top