
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करण्यात येते. या खताचा उपयोग शेतकरी तसेच नागरिकांना करता यावा यासाठी राहुरी येथील कृषी विद्यापीठ प्रयोगशाळेत खताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते परीक्षणानंतर हे खत वापरण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. या खताचे विपणन व विक्री करण्यासाठी पालिकेने शासनाकडे हरित –महासिटी कंपोस्ट हा शासनाचा नोंदणी कृत ब्रॅंड वापरण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रस्ताव सादर केला होता. शासनाने त्यास परवानगी दिली असून हरित- महासिटी कंपोस्ट" ब्रॅंड एक वर्षासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना प्रदान करण्यात आला आहे.