
तुम्हाला आमचा पाहुणा बनावं लागेल; मुंबई पोलिसांचं वाइनबद्दल विचारणाऱ्याला भन्नाट उत्तर
मुंबई : आता किराणा दुकान व सुपरमार्केटमध्ये वाइनची (Wine) खरेदी आणि विक्री करता येईल. राज्य सरकारने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला. यामुळे नागरिकांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. अशातच एका नेटकऱ्याने वाईनं पिऊन गाडी चालवली तर बार दाखवणार की तुरुंग, असा प्रश्न मुंबई पोलिसांना विचारला होता. यावर पोलिसांनी मजेशीर उत्तर (Answer) दिले आहे.
राज्य सरकारने ‘वाईनं पॉलिसी’ मंजूर केली आहे. या पॉलिसीअंतर्गत किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाइनची (Wine) खरेदी आणि विक्री करता येईल. या निर्णयाला विरोधक विरोध करीत आहे. असे असताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वाइनची विक्री शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचे सांगत वाईनं म्हणजे दारू नाही, असे म्हटले. वाइनची विक्री वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही म्हटले आहे.
वाईनं पॉलिसी मंजूर केल्यानंतर नेटकऱ्याने थेट मुंबई पोलिसांना (Mumbai Police) प्रश्न केला आहे. वाईनं पिऊन गाडी चालवली तर मुंबई पोलिस मला जवळचा बार दाखवतील की तुरुंगात टाकतील?’ असे त्याने ट्विट करून विचारले. यावर मुंबई पोलिसांनीही मजेशीर उत्तर देत नेटकऱ्याचे तोंड बंद केले. ‘सर, आम्ही तुम्हाला ‘जबाबदार नागरिक’ म्हणून मद्यपान केल्यानंतर बारमधून उठून ड्रायव्हर असलेल्या गाडीत बसण्याची शिफारस करतो. याउलट तुम्ही दारूच्या नशेत गाडी चालवली आणि ब्रेथलायझरमध्ये तुमच्या ड्रिंकमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळले, तर तुम्हाला आमचा पाहुणा बनावे लागेल.’ असे मुंबई पोलिसंनी (Mumbai Police) आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Web Title: Grocery Stores And Supermarkets Wine Buying And Selling Answer Of Mumbai Police Internet Users
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..