esakal | आईला त्रास होऊ नये म्हणून गाडी ठेवली सुरु, पुढे जे घडलं ते मन सुन्न करणारं
sakal

बोलून बातमी शोधा

आईला त्रास होऊ नये म्हणून गाडी ठेवली सुरु, पुढे जे घडलं ते मन सुन्न करणारं

आईला त्रास होऊ नये म्हणून गाडी ठेवली सुरु, पुढे जे घडलं ते मन सुन्न करणारं

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईत जसा-जसा विकास होतोय तशी तशी नवी मुंबई गुन्हांची राजधानी होतेय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. ही बातमी वाचाल तर तुम्हाला धक्का बसेल. तुमचं मन सुन्न होईल. तुम्ही कुठेच सुरक्षित नाहीत हेच या बातमीतून पुन्हा एकदा अधोरिखित झालंय. 

अज्ञात लुटारूने बँकेच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये प्रवेश करून कार पळवून नेऊन नेली. प्राथमिक माहितीत कारमध्ये बसलेल्या महिलेची हत्या करून त्यांच्या अंगावरील दागिने लुटून पलायन केल्याची घटना समोर येत होती. भरदुपारी घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडालीये. सदर कार वहाळ गावाजवळ आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

मोठी बातमी - 'या' वयोगटातील नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका...

उरणच्या शेलघर गावात राहणारा सुरज भगत हा आपली आई प्रभावती भगत यांना घेऊन सोमवारी दुपारी उलवे सेक्टर 19 मधील बँक ऑफ महाराष्ट्र येथे गेला होता. बॅकेत जातांना सुरज स्विफ्ट गाडीत आईला बसवून गाडीतील एसी चालू ठेवून बॅकेत गेले होता. याचवेळी त्याठिकाणी आलेल्या लुटारूने सुरजच्या स्विफ्ट कार मध्ये प्रवेश करून त्याची कार पळवुन नेली.

मोठी बातमी - ' तिची आणि तुझी 'ही' रास आहे ? 'या' राशींच्या कपल्सचं पटणं कठीण...

यावेळी कारमध्ये बसलेल्या प्रभावती भगत यांनी लुटारूला विरोध करून आरडाओरड केल्याने सदर लुटारूने प्रभावती भगत यांच्यावर हल्ला करून त्यांच्या अंगावरील दागिने लुटले, त्यानंतर लुटारूने सदर कार वहाळ गावाजवळ सोडून पलायन केले अशी माहिती समोर येत होती. मात्र अधिकच्या माहितीत या महिलेच्या अंगावरील काही दागिने गाडीतच असल्याचं समजतंय. लुटारूच्या हल्ल्यात प्रभावती भगत या गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तेथिल डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर  पोलिसांनी अज्ञात लुटारूच्या शोध सुरू केला आहे. नवी मुंबई पोलिस या प्रकरणी पुढील तपस करत आहेत. 

group in ulve looted women seating in the car read full story

loading image
go to top