मुंबईत हक्काचे 'डबेवाला भवन'; पालकमंत्री ठाकरे यांच्या हस्ते उद्‍घाटन

Aditya Thackeray
Aditya Thackeraysakal media

मुंबई : मुंबईतील डबेवाल्यांचे ‘डबेवाला भवन’ (Dabewala Bhavan) उभारण्यात आले आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या भवनाचे उद्‍घाटन पार पडले. बेस्ट बस आणि उपनगरी रेल्वेला मुंबईची लाईफलाईन (Mumbai railway) म्हटले जाते. त्या नसा असतील, तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत, अशा शब्दांत पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पालिकेच्या शेरली, वांद्रे व्हिलेज, वांद्रे (पश्चिम) येथील समाज कल्याण केंद्राची २८६.२७ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा मुंबई ‘टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन’ला देण्यात आली आहे.

Aditya Thackeray
शुल्क सुधारणा अहवालात पालकांच्या पदरी निराशा ?

या वेळी आदित्य म्हणाले, की मुंबईचे डबेवाले शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहेत. मुंबईकरांना वेळेवर जेवण पोहोचवण्याचे काम ते अखंडपणे करीत आहेत. मुंबई कधी थांबत नाही आणि मुंबई चालवणाऱ्या घटकांमध्ये डबेवाल्यांचा समावेश आहे. कोरोना काळात विविध प्रकारे त्यांनी मुंबईकरांची सेवा केल्याचे सांगून आज विविध ऑनलाईन सेवा देणाऱ्या संस्था अस्तित्वात असतानाही डबेवाल्यांच्या स्वतःच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे ते कुठेही मागे पडलेले नाहीत.

डबेवाल्यांसाठी भवन उभारण्याच्या दिलेल्या वचनाची पूर्तता झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांचे डबेवाल्यांशी नाते जोडले गेले असल्याचे सांगितले. डबेवाल्यांसोबतच्या स्वतःच्या आठवणी सांगून डबेवाल्यांसाठी स्वतंत्र भवन असावे, असा प्रस्ताव आल्यानंतर त्यास तातडीने मंजुरी दिल्याचे त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com