
अनुपमा गोखले
मुंबई : विश्वविजेतेपदाच्या लढतीतील चौदावा डाव जिंकून डोमाराजू गुकेशने आपले नाव बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरण्याचा पराक्रम केला आहे. वयाच्या केवळ अठराव्या वर्षी अठरावा विश्वविजेता होण्याचा मान गुकेशने मिळविला आहे. विशी आनंदच्या नंतर गुकेश हा केवळ दुसरा भारतीय जगज्जेता ठरला आहे. गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वांत लहान विश्र्वविजेता ठरला आहे. विश्व अजिंक्यपदाची ही बुद्धिबळ स्पर्धा सिंगापूर येथे झाली.