गुलाबराव, तुमच्या काळजाला पाझर का नाही फुटला? ; सुषमा अंधारे यांचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabrao Patil

गुलाबराव, तुमच्या काळजाला पाझर का नाही फुटला? ; सुषमा अंधारे यांचा सवाल

जळगाव : ‘‘मी एकेकाळी शिवसेनेची टीकाकार होते, मात्र ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कपटकारस्थान करण्यात आले त्यावेळी आमच्यासारख्या टीकाकारांच्या काळजाला पाझर फुटला आणि आम्ही पडत्या काळात त्यांच्या पाठीशी साथ देण्यासाठी उभे राहिलो. तुम्ही तीस वर्षे त्यांच्यासोबत होता, तरी त्यांना सोडून तुम्ही निघून गेलात.

गुलाबराव तुमच्या काळजाला पाझर का नाही फुटला?’’ असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी महाप्रबोधन यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा मंगळवारी जळगाव जिल्ह्यात दाखल झाली. त्यावेळी अंधारे बोलत होत्या.