esakal | 'टी सिरिज'च्या भूषण कुमारांवर अंधेरीत बलात्काराचा गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

'टी सिरिज'च्या भूषण कुमारांवर अंधेरीत बलात्काराचा गुन्हा दाखल

'टी सिरिज'च्या भूषण कुमारांवर अंधेरीत बलात्काराचा गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भूषण कुमार हे गुलशन कुमार यांचे पुत्र; ३० वर्षीय महिलेने केली तक्रार

मुंबई: गीतकार गुलशन कुमार यांचे पुत्र आणि टी सिरिज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा अंधेरीमध्ये दाखल झाला आहे. टी सिरीजच्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून 30 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप पिडितेने केला आहे. पीडित महिलेने भूषण कुमार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. भूषण कुमार हे गेली तीन वर्षे त्या महिलेवर अत्याचार करत असल्याचे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. (Gulshan Kumar son and T Series Managing Director Bhushan Kumar is charged under rape case of 30 year old woman)

हेही वाचा: खडसेंनंतर आता भाजप आमदाराच्या तोंडी 'ED अन् CD'ची भाषा

गीतकार गुलशन कुमार यांनी नावारूपाला आणलेली टी सिरीज ही कंपनी गेल्या काही दिवसात अनेकदा वादात सापडली आहे. सध्या गुलशन कुमार यांचे पुत्र आणि टी सिरिज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांच्यावर अंधेरीच्या डि.एन.नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. टी सिरीजच्या एका प्रोजेक्टमध्ये काम देतो असे आमिष दाखवून एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. काम देण्याच्या नावाखाली २०१७ ते २०२० असे सुमारे तीन वर्षे या मुलीवर कुमार हे अत्याचार करत होते असा आरोप त्या महिलेने केला आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अत्याचार केला असल्याचे पीडितेने नमूद केले आहे. तसेच, पिडितेचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देण्याच येत असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

loading image