मुंबईत लवकरच जिम होणार सुरु, पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

 मुंबईसह राज्यभरातील केशकर्तनालये (सलून) आणि व्यायामशाळा (जिम) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी गुरुवारी दिली

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील केशकर्तनालये (सलून) आणि व्यायामशाळा (जिम) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी गुरुवारी दिली. यासंदर्भात येत्या दोन दिवसात  नियमावली आणि मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातील. त्याआधारे राज्यभरातील केशकर्तनालयाची दुकाने तसेच व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

BIG NEWS वृत्तपत्र वितरणास मज्जाव केल्यास कारवाई; जिल्हा उपनिबंधकांचा सोसायट्यांना इशारा

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत गेले तीन महिने बंद असलेली केशकर्तनालय आणि व्यायामशाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली. केशकर्तनालय आणि व्यायामशाळा सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरे सुद्धा आग्रही होते. सलून आणि जिम मालक- चालक संघटनेच्या  प्रतिनिधींच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्यात आल्या होत्या, असे शेख म्हणाले.

BIG NEWS -  'केईएम हॉस्पिटलनेच माझ्या मुलाचा जीव घेतला'; मृताच्या कुटुंबीयांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप..

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून राज्यभरातील केशकर्तनालये बंद आहेत. दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी नाभिक समाजाने आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत सरकारने काही अटी घालून सलून दुकाने सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

gyms in mumbai will start soon says mumbais guardian minister aslam sheikh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gyms in mumbai will start soon says mumbais guardian minister aslam sheikh